सैफला करिनाने इतक्या वेळा दिला होता लग्नासाठी नकार, तरीही सैफने मानली नाही हार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2020 06:00 AM2020-04-04T06:00:00+5:302020-04-04T06:00:00+5:30

आपल्या पर्सनल लाईफबाबत अनेक इंटरेस्टिंग गोष्टी शेअर केल्या.

kareena kapoor refused saif ali khan marriage proposal two times gda | सैफला करिनाने इतक्या वेळा दिला होता लग्नासाठी नकार, तरीही सैफने मानली नाही हार

सैफला करिनाने इतक्या वेळा दिला होता लग्नासाठी नकार, तरीही सैफने मानली नाही हार

googlenewsNext

चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगातील १८० पेक्षा जास्त देशांना विळख्यात घेतलं आहे.देशात परिस्थिती अतिशय भयाण असून अनेकजण आपापल्यापरिने गरजू लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. बॉलिवूडचे अनेक कलाकारांनी पीएम केअर फंडला मदत केली आहे.

नवाब सैफ आणि करिना देखील पुढे आले आहेत. सैफिनाने पीएम केअर फंडमध्ये नाही तर यूनिसेफ (UNICEF), गिव्ह इंडिया (GIVE INDIA) आणि द इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्यूमन वॅल्‍यूजला (IAHV) या संस्थांना मदतनिधी दिला आहे. खुद्द करीनाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. तसेच इतरांनी देखील पुढे येत मदत करण्याचे आवाहन केले आहे.

आपल्या पर्सनल लाईफला घेऊनसुद्दा सैफ आणि करिना चर्चेत असतात.  जागरणच्या रिपोर्टनुसार करीनाने दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्या पर्सनल लाईफबाबत अनेक इंटरेस्टिंग गोष्टी शेअर केल्या. रिपोर्टनुसार करीनाने सैफशी लग्न करण्यास नकार दिला होता. करीनाला सैफने ग्रीसमध्ये प्रपोज केले होते. मात्र तिने दोन वेळा सैफला नकार दिला. सैफने आधी ग्रीस मग लडाखमध्ये करीनाला प्रपोज केले होते.

रिपोर्टनुसार मुलाखती दरम्यान म्हणाली करीना म्हणाली की, ''सैफ मला म्हणाला की मला असे वाटते की आपण आता लग्न करायला हवं. मला हे नाही माहिती कारण मी तुला अजून तेवढं ओळखंत नाही अशी काहीशी माझी प्रतिक्रिया होती. अर्थात यात माझा नकार नव्हता. याचा अर्थ असा होता की मला सैफला अजून चांगल्या प्रकारे समजून घ्यायचे होता. सैफशी लग्न करणं हा माझ्या करिअरमधला सगळ्यात चांगला निर्णय होता.''   

 

Web Title: kareena kapoor refused saif ali khan marriage proposal two times gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.