ओळखा पाहू कोण? व्हायरल होतोय ‘या’ चिमुकलीची फोटो, आज आहे स्टाईल आयकॉन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 08:05 PM2021-05-16T20:05:31+5:302021-05-16T20:08:34+5:30

बालपणीच्या आठवणींमध्ये हरवायला कुणाला आवडत नाही? अगदी सेलिब्रिटीही याला अपवाद नाहीत.

kareena kapoor childhood pic viral on social media | ओळखा पाहू कोण? व्हायरल होतोय ‘या’ चिमुकलीची फोटो, आज आहे स्टाईल आयकॉन

ओळखा पाहू कोण? व्हायरल होतोय ‘या’ चिमुकलीची फोटो, आज आहे स्टाईल आयकॉन

Next
ठळक मुद्देकरिनाचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. प्रेग्नंसीआधीच करिनाने या सिनेमाचे शूटींग संपवले होते.

बालपण देगा देवा, असे म्हणतात ते उगाच नाही. बालपणीच्या आठवणीत रमायला कुणाला आवडत नाही. अगदी सेलिब्रिटीही याला अपवाद नाहीत. आता बेबो अर्थात करिना कपूरचेच (kareena kapoor) उदाहरण घ्या. बेबो म्हणायला दोन मुलांची आई झालीये, पण बालपणीच्या अनेक आठवणी ती शेअर करत असते. काही दिवसांपूर्वीच बेबोन बालपणीचा एक क्यूट फोटो तिने शेअर केला होता. हा फोटो सध्या तुफान व्हायरल होतोय.

या फोटोत करिना प्रचंड क्यूट दिसतेय. साहजिकच, तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेबोने हा फोटो शेअर केला होता. सध्या कुणी हस्तांदोलन करण्याचा प्रयत्न केला की, मी असे एक्सप्रेशन देते, अशा आशयाचे कॅप्शन तिने या फोटोला दिले होते.

अभिनेते रणधीर कपूर आणि अभिनेत्री बबिता यांची छोटी मुलगी करीना कपूर अभिनेत्री करिश्मा कपूरची बहिण आहे. करीना कपूरने बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे.  करीना कपूरने २००० साली रिफ्युजी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. या चित्रपटासाठी करीना कपूर फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाला होता. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. आज करिना बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. शिवाय स्टाईल आयकॉनही आहे.
 काहीच महिन्यांपूर्वी करिना दुस-यांदा आई बनली आहे. दुस-या मुलाला जन्म दिल्यानंतर महिनाभरातच ती कामावर परतली आहे. करिनाचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. प्रेग्नंसीआधीच करिनाने या सिनेमाचे शूटींग संपवले होते.
 
   

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: kareena kapoor childhood pic viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app