karan johar trolled for wearing newspaper print outfit | करण जोहरचा अवतार पाहून नेटकऱ्यांनी दिला सल्ला; म्हणाले, इसे पढना होता है पहनना नहीं...! 

करण जोहरचा अवतार पाहून नेटकऱ्यांनी दिला सल्ला; म्हणाले, इसे पढना होता है पहनना नहीं...! 

ठळक मुद्देकरणच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास, त्याने अलीकडे पाच नव्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे.

कपड्यांमुळे चर्चेत राहणाºया सेलिब्रिटींची बॉलिवूडमध्ये कमतरता नाही. दिग्दर्शक, निर्माता करण जोहर त्यापैकीच एक़ काही हटके करण्याच्या नादात करण जोहर अगदी रणवीर सिंगलाही टक्कर देतो. साहजिकच, रणवीर ट्रोल होतो तसाच करण जोहरही ट्रोल होतो. आता हेच पाहा ना, करणने असा काही शर्ट घातला की, सोशल मीडियावर तो जबरदस्त ट्रोल झाला.
तर निमित्त होते, फॅशन डिझाइनर मनीष मल्होत्राच्या घरच्या पार्टीचे. मलायका अरोरा, अमृता अरोरा, गौरी खान, सीमा खान असे सगळे या पार्टीत होते. पण सर्वाधिक चर्चा झाली तर करण जोहरची. या पार्टीत करण अशा काही अवतारात पोहोचला की, त्याच्या आऊटफिटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

त्याने ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईटसारखा शर्ट घातला होता आणि त्याच्या या शर्टवर न्यूजपेपर प्रिंट होते. त्याचे या शर्टमधील फोटो व व्हिडीओ समोर आले आणि नेटक-यांची फटकेबाजी सुरू झाली.

अगदी न्यूजपेपर दिसतोय, असे एका युजरने करणचा फोटो पाहून लिहिले. अन्य एकाने तर करणची चांगलीच मजा घेतली. कोई करण को समझाए की इसे पढना होता है, पहनना नहीं, असे या युजरने लिहिले. एका युजरने त्याला ‘चलता फिरता अखबार’ म्हणत त्याची खिल्ली उडवली.
करणच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास, त्याने अलीकडे पाच नव्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे. यात दास्तान्स, फायडिंग अनामिका, सर्चिंग फॉर शीला, फॅब्युलस लाइव्स ऑफ बॉलिवूड वाइफ्स 2 चा समावेश आहे. हे सर्व प्रोजेक्ट ओटीटीवर रिलीज होणार आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: karan johar trolled for wearing newspaper print outfit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.