ठळक मुद्देट्रोलिंगमुळे करण जोहर प्रचंड दुखावला आहे. रात्रंदिवस तो नुसता रडत असतो, असा खुलासा आता त्याच्या एका जवळच्या मित्राने केला होता.

सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर करण जोहर सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होतोय. या ट्रोलिंगमुळे करण प्रचंड खचला असून दिवसरात्र नुसता रडत असतो, असा खुलासा अलीकडेच त्याच्या एका मित्राने केला होता. अर्थात काल नीतू सिंग यांच्या बर्थ डे सेलिब्रेशनमध्ये करण जोहर पार्टी करताना दिसला आणि नेटकरी पुन्हा अ‍ॅक्टिव्ह झालेत.
खरे तर सुशांतच्या मृत्यूनंतर करणने सोशल मीडियावर पोस्ट करणे बंद केले आहे. गेल्या अनेक दिवसांत तो कुठेही बाहेर पडलेला दिसला नाही. मात्र नीतू सिंग यांच्या बर्थ डे पार्टीत त्याला पाहून युजर्स पुन्हा त्याच्यावर तुटून पडलेत. या पार्टीचा एक फोटो व्हायरल झाला. या फोटोत करण जोहर हसत हसत पोज देताना दिसतोय. हा फोटो पाहून युजर्सनी करणला पुन्हा ट्रोल करणे सुरु केले. 

ट्रोलिंगमुळे करण जोहर खचला, रडतोय असे काय काय आम्ही ऐकले होते पण येथे तर तो अगदी आनंदात दिसतोय, असे लिहित अनेक युजर्सनी त्याच्यावर निशाणा साधला.


एका युजरने तर करण जोहरला ‘केजोमती’ नाव दिले. ‘मला तर ड्रामा क्वीन केजोमतीच्या चेह-यावर जराही दु:ख दिसत नाहीये,’ असे या युजरने लिहिले.

अन्य एका युजरनेही करणला डिवचले. ‘करण जोहर ढसाढसा रडत असल्याचे मी ऐकले होते. हिपोक्रेसीचा हा कळस आहे,’असे या युजरने करणला डिवचताना लिहिले.

म्हणे ढसाढसा रडतो...
करण जोहर आणि त्याची गँग सोशल मीडियावर अतिशय वाईट पद्धतीने ट्रोल होतेय. या ट्रोलिंगमुळे करण जोहर प्रचंड दुखावला आहे. रात्रंदिवस तो नुसता रडत असतो, असा खुलासा आता त्याच्या एका जवळच्या मित्राने केला होता. ‘चौफेर टिकेने करण आतून कोलमडलाय. ट्रोलर्सच्या हल्ल्यांनी याआधी तो कधीही इतका प्रभावित झाला नव्हता. या ट्रोलिंगचा त्याच्या प्रकृतीवरही वाईट परिणाम झाला आहे. ट्रोलर्स त्याच्यावर नाही तर त्याच्या जवळच्या लोकांबद्दलही वाईट बोलत आहेत. त्याच्या जुळ्या मुलांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत, हे पाहून करण अधिक दु:खी आहे. करण सध्या काहीही बोलण्याच्या मन:स्थितीत नाही. त्याच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला तरी तो ढसाढसा रडायला लागतो. मी असे काय केले की, लोक मला इतक्या शिव्या घालत आहेत, असा एकच प्रश्न तो विचारतो, असे त्याच्या मित्राने सांगितले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: karan johar trolled for partying with ranbir kapoor at neetu kapoor birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.