karan johar has a private account for celebrities on social media | सुशांतच्या निधनानंतर करण जोहरने सोशल मीडियावर बनवले नवे प्रायव्हेट अकाऊंट?, हे सेलिब्रेटी करतायेत फॉलो

सुशांतच्या निधनानंतर करण जोहरने सोशल मीडियावर बनवले नवे प्रायव्हेट अकाऊंट?, हे सेलिब्रेटी करतायेत फॉलो

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येमुळे पुन्हा एकदा बॉलिवूडमधील नेपोटिजमचा वाद पुन्हा एकदा चर्चेत आहेत. यानंतर सुशांत सिंग राजपूतच्या चाहत्यांनी करण जोहर, सलमान खान, सोनम कपूर, अनन्या पांडे अशा अनेक सेलिब्रिटींना सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली. यानंतर, अनेक सेलिब्रिटींनी एकतर त्यांची सोशल मीडिया अकाऊंट प्राइव्हेट केले किंवा डिएटीव्हेट केले. सुशांतच्या आत्महत्येच्या दिवसापासून करणदेखील त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सक्रिय नाही आहे मात्र नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार करण जोहरने बॉलिवूड सेलिब्रेंटीसाठी एक प्रायव्हेट अकाऊंट तयार केले आहे.

ही पहिलीच वेळ नाही जेव्हा करण जोहरला  नेपोटिजमच्या वादावर ट्रोल केले जात आहे. अनेकवेळा तो या मुद्द्यावर ट्रोल झाला आहे. रिपोर्टनुसार करण जोहरचे नाव  'karanafffairs' दिसले आहे. हे अकाऊंट वेरिफाईड नाही. मात्र त्याच्या या अकाऊंटला शाहरुख खानची पत्नी गौरी खान मुलगी सुहाना, अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता आणि अनन्या पांडे फॉलो करते आहे. यावरुन असे अंदाज वर्तविले जात आहे की करणने बॉलिवूड सेलेब्ससाठी एका प्रायव्हेट अकाऊंट सुरु केले आहे. 

काही दिवसांपूर्वी करण जोहरच्या एका मित्राने सांगितले होते की, सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर चौफेर टिकेने करण आतून कोलमडलाय.ट्रोलर्सच्या हल्ल्यांनी याआधी तो कधीही इतका प्रभावित झाला नव्हता. या ट्रोलिंगचा त्याच्या प्रकृतीवरही वाईट परिणाम झाला आहे. ट्रोलर्स त्याच्यावर नाही तर त्याच्या जवळच्या लोकांबद्दलही वाईट बोलत आहेत. त्याच्या जुळ्या मुलांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत, हे पाहून करण अधिक दु:खी आहे. त्याच्या मित्राने सांगितले की, करण सध्या काहीही बोलण्याच्या मन:स्थितीत नाही. त्याच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला तरी तो ढसाढसा रडायला लागतो. मी असे काय केले की, लोक मला इतक्या शिव्या घालत आहेत, असा एकच प्रश्न तो विचारतो.

Read in English

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: karan johar has a private account for celebrities on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.