हृतिक रोशन बनणार ‘हेर’; धर्मा प्रॉडक्शनच्या या सिनेमात लागली वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 01:15 PM2020-01-14T13:15:28+5:302020-01-14T13:16:02+5:30

बॉलिवूडचा ग्रीक गॉड हृतिक रोशनने गतवर्षी ‘सुपर 30’ व ‘वॉर’ या सुपरहिट सिनेमांसह बॉक्स ऑफिसवर धमाकेदार वापसी केली.

karan johar approached hrithik roshan for a film on indian spymaster rn kao | हृतिक रोशन बनणार ‘हेर’; धर्मा प्रॉडक्शनच्या या सिनेमात लागली वर्णी

हृतिक रोशन बनणार ‘हेर’; धर्मा प्रॉडक्शनच्या या सिनेमात लागली वर्णी

googlenewsNext
ठळक मुद्देया चित्रपटाशिवाय फराह खानच्या ‘सत्ते पे सत्ता’च्या रिमेकमध्येही हृतिक दिसणार असल्याची शक्यता आहे.

बॉलिवूडचा ग्रीक गॉड हृतिक रोशनने गतवर्षी ‘सुपर 30’ व ‘वॉर’ या सुपरहिट सिनेमांसह बॉक्स ऑफिसवर धमाकेदार वापसी केली. त्याआधी दीर्घकाळ हृतिक रूपेरी पडद्यापासून दूर होता. ‘सुपर 30’ व ‘वॉर’ या सिनेमांच्या यशानंतर हृतिकचे नाव काही मोठ्या प्रोजेक्टसोबत जोडले जात आहे. अर्थात अद्याप यापैकी कुठल्याही प्रोजेक्टची अधिकृत घोषणा झालेली नाही. ताजी बातमी खरी मानाल तर, धर्मा प्रॉडक्शनच्या एका आगामी स्पाय थ्रीलर सिनेमात हृतिकची वर्णी लागली आहे.


हा सिनेमा नितीन गोखले यांच्या ‘R.N. Kao: Gentleman Spymaster’ या पुस्तकावर आधारित असल्याचे कळतेय. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने काही दिवसांपूर्वीच या पुस्तकाचे हक्क खरेदी केले. खुद्द करणने याबाबतची घोषणा केली होती. या सिनेमासाठी हृतिकशी संपर्क साधण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. विशेष म्हणजे, हृतिकलाही चित्रपटाची कथा आवडली आहे. मात्र अद्याप त्याने हा चित्रपट साईन केलेला नाही.


हा सिनेमा रिअल लाईफ इंडियन स्पायमास्टर रामेश्वर नाथ काव यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे. रामेश्वर नाथ यांनी भारताच्या ‘रॉ’ या गुप्तहेर संघटनेची पायाभरणी केली.
या चित्रपटाशिवाय फराह खानच्या ‘सत्ते पे सत्ता’च्या रिमेकमध्येही हृतिक दिसणार असल्याची शक्यता आहे. आनंद एल राय आणि रोहित धवनच्या एका सुपरहिरो सिनेमासाठीही त्याचे नाव चर्चेत आहे. ‘क्रिश 4’मध्येही हृतिक झळकणार आहे. अद्याप हृतिकने एकही चित्रपट साईन केलेला नाही. पण येत्या काळात हृतिकच्या चाहत्यांना आपल्या आवडत्या स्टारच्या एकापेक्षा एक सरस चित्रपटांची मेजवानी मिळणार, हे मात्र नक्की आहे.

Read in English

Web Title: karan johar approached hrithik roshan for a film on indian spymaster rn kao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.