ठळक मुद्दे‘द जोया फॅक्टर’ या सिनेमात सोनम कपूर व दलकीर सलमान लीड रोलमध्ये आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरचा ‘द जोया फॅक्टर’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. येत्या 20 सप्टेंबरला प्रदर्शित होणा-या या चित्रपटात सोनम साऊथ सुपरस्टार दुलकर सलमानसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. सध्या सोनम व सलमान या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनमने कपिल शर्मा शोच्या सेटवर हजेरी लावली. यावेळी सोनमने बालपणीचे अनेक खुलासे केलेत.


लहान असताना डॅड अनिल कपूर सोनमला कधीच आपल्या चित्रपटाच्या सेटवर नेत नसत. यामागचे कारण सोनमने सांगितले. तिने सांगितले की,चित्रपटांचे शूटींग कसे होते, हे मला माहित नव्हते. त्यामुळे जेव्हाकेव्हा डॅडला मार पडताना पाहायचे तेव्हा मी घाबरून जायचे. क्यों मार रहे हो मेरे पापा को, असे म्हणत मी मोठमोठ्याने रडायला लागायचे. एकदा पापानी मला सेटवर नेले आणि मी तिथे असाच गोंधळ घातला. यानंतर पापा मला पुन्हा कधीच सेटवर घेऊन गेले नाहीत.


अभिनेत्री व्हायचा आधी सोनम चांगलीच गोलमटोल होती. एकदा तर सोनमने एकाचवेळी 40 समोसे खाल्लेत. सोनमने सांगितले की, बोर्डींग स्कूलमध्ये असताना मला जंक फूड खूप आवडायचे. सुट्टीत घरी आले की, घरचे जेवण मला आवडायचे. एकदा मी 40 समोसे खाल्ले. पण ते मिनी कॉकटेल समोसे होते, असे तिने लगेच स्पष्ट केले.  
‘द जोया फॅक्टर’ या सिनेमात सोनम कपूर व दलकीर सलमान लीड रोलमध्ये आहेत. याशिवाय अंगद बेदी, संजय कपूर महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. या चित्रपटाची कथा अनुजा चौहान लिखीत एका कादंबरीवर आधारीत आहे.


Web Title: the kapil sharma show sonam kapoor used to get scared seeing her fathers film
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.