OMG! पहिला चित्रपट रिलीज होताच या अभिनेत्याला एकाचवेळी आले होते 30 हजार लग्नाचे प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 12:48 PM2019-09-26T12:48:22+5:302019-09-26T12:54:16+5:30

बॉलिवूडच्या हँडसम हिरोंची यादी बनवलीच तर धर्मेन्द्र यांच्यानंतर या अभिनेत्याचे नाव येईल.

the kapil sharma show hrithik roshan revealed that he got 30000 marriage proposals after kaho naa pyaar hai | OMG! पहिला चित्रपट रिलीज होताच या अभिनेत्याला एकाचवेळी आले होते 30 हजार लग्नाचे प्रस्ताव

OMG! पहिला चित्रपट रिलीज होताच या अभिनेत्याला एकाचवेळी आले होते 30 हजार लग्नाचे प्रस्ताव

googlenewsNext
ठळक मुद्देलवकरच हृतिकचा ‘वॉर’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात हृतिकसोबत टायगर श्रॉफही मुख्य भूमिकेत आहे.

बॉलिवूडच्या हँडसम हिरोंची यादी बनवलीच तर धर्मेन्द्र यांच्यानंतर हृतिक रोशन याचेच नाव येईल. एकेकाळी तरूणाई धर्मेन्द्र यांच्या स्टाईलवर फिदा होती. त्यानंतर हृतिकनेही तरूणाईला असेच वेड लावले. त्याचा डान्स असो वा लूक्स दोन्हींवर तरूणाई फिदा झाली.
हृतिक रोशनने ‘कहो ना प्यार है’ मधून डेब्यू केला आणि सगळेच त्याच्या प्रेमात पडले. तरूणींना तर हृतिकने अक्षरश: वेड लावले. त्याचमुळे ‘कहो ना प्यार है’ रिलीज झाल्यावर हृतिकला 30 हजार लग्नाचे प्रस्ताव मिळाले होते. होय, नुकताच ‘द कपिल शर्मा शो’मध्ये खुद्द हृतिकने हा खुलासा केला.


एकीकडे हृतिकसाठी तरूणी वेड्या झाल्या होत्या. दुसरीकडे त्याचकाळात हृतिकने त्याची बालपणीची मैत्रिण सुजैन खानसोबत लग्न केले होते. जानेवारी 2000 मध्ये हृतिकचा ‘कहो ना प्यार है’ रिलीज झाला आणि त्याचवर्षी डिसेंबर महिन्यात हृतिकने सुजैनसोबत लग्न केले. अर्थात 13 वर्षांनंतर हे नाते कायदेशीररित्या संपुष्टात आले. 2013 मध्ये दोघांनाही घटस्फोट घेतला.


लवकरच हृतिकचा ‘वॉर’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात हृतिकसोबत टायगर श्रॉफही मुख्य भूमिकेत आहे. ‘वॉर’मध्ये टायगर आणि हृतिक गुरु-शिष्याच्या भूमिकेत आहेत. पण पुढे टायगर हृतिकच्या विरोधात जातो आणि सुरु होते ते ‘वॉर’.  

टायगर आपल्या गुरूच्याच विरोधात का जातो आणि या वॉरचा शेवट काय होतो, हे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. गांधी जयंतीच्या मुहुर्तावर अर्थात 2 ऑक्टोबरला हा सिनेमा देशभरात प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून आदित्य चोप्राने सिनेमाची निर्मिती केली आहे. 

Web Title: the kapil sharma show hrithik roshan revealed that he got 30000 marriage proposals after kaho naa pyaar hai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.