kangna ranaut sister rangoli target alia bhatt blame award fixing | Star Screen Awards 2019 : काय आलिया भटने केले ‘अवार्ड फिक्सिंग’? व्हायरल व्हिडीओवर रंगोलीचा सवाल 
Star Screen Awards 2019 : काय आलिया भटने केले ‘अवार्ड फिक्सिंग’? व्हायरल व्हिडीओवर रंगोलीचा सवाल 

ठळक मुद्देकाल स्टार स्क्रिन अवार्ड 2019 चा रंगारंग सोहळा झाला. या सोहळ्यात आलिया भट हिलाही नॉमिनेट केले गेले होते.

अभिनेत्री कंगना राणौत आणि तिची बहीण रंगोली चंदेल दोघीही कधी कुणाला लक्ष्य करतील, सांगता यायचे नाही. सध्या आलिया भट रंगोलीच्या निशाण्यावर आहे. होय, आलियाचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओवरूनच रंगोलीने आलियाला लक्ष्य केले आहे. आता हा काय मामला आहे, ते जाणून घेऊ यात.
तर या व्हिडीओत आलियाच्या हाती बेस्ट अ‍ॅक्ट्रेसचा अवार्ड आहे आणि ती फोटोग्राफर्सला पोज देतेय. वरवर पाहता, या व्हिडीओत काहीही वावगे वाटणार नाही. पण हा व्हिडीओ इव्हेंट सुरु होण्यापूर्वीचा आहे. 

होय, इव्हेंट सुरु होण्याआधीच आलिया पुरस्कार घेऊन घरी पोहोचली. व्हिडीओत आलिया आपल्या गाडीकडे जाताना दिसतेय. त्याक्षणी मागून ‘अभी नहीं डालोगे ना मनोज?’ असा आवाज येतो. उत्तरादाखल ‘नहीं एक घंटे बाद’ असे म्हटले जाते. यानंतर, ‘नहीं, 8 बजे के बाद,’ असे सांगितले जाते. यावरून हा व्हिडिओ अवार्ड फंक्शन सुरु होण्याच्या आधीचा आहे, हे कळते.


रंगोलीने आलियाची नेमकी ही ‘चोरी’ पकडली.  केवळ इतकेच नाही तर तिने आलियावर ‘अवार्ड फिक्सिंग’चा आरोप केला आहे.
‘चल, तू हे काम चोरून लपून करतेय म्हणजे काही तर प्रामाणिकपणा शिल्लक आहे. काही तर शिल्लक आहे, हे पाहून आनंद वाटला,’असे तिने टिष्ट्वट रंगोलीने केलेय.
काल स्टार स्क्रिन अवार्ड 2019 चा रंगारंग सोहळा झाला. या सोहळ्यात आलिया भट हिलाही नॉमिनेट केले गेले होते. यादरम्यान आलियाला ‘गली बॉय’ या चित्रपटासाठी बेस्ट अ‍ॅक्टर फिमेल पॉप्युलरचा अवार्ड दिला गेला.  पण त्याआधीच आलियाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला.

Web Title: kangna ranaut sister rangoli target alia bhatt blame award fixing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.