kangna ranaut asked why did sushant singh rajput want to leave bollywood and do farming | सुशांतला बॉलिवूड सोडून शेती का करायची होती? कंगना राणौतने पुन्हा साधला घराणेशाहीवर निशाणा

सुशांतला बॉलिवूड सोडून शेती का करायची होती? कंगना राणौतने पुन्हा साधला घराणेशाहीवर निशाणा

ठळक मुद्देसुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीचा वाद चांगलाच तापला आहे. कंगना राणौतने हा मुद्दा लावून धरला आहे.  

वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणाने अचानक वळण घेतले आहे. सुशांतच्या वडिलांनी सुशांतची कथित गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप केले आहेत. शिवाय सुशांत बॉलिवूडची दुनिया सोडून केरळमध्ये ऑर्गेनिक शेती करू इच्छित होता, असा खुलासाही  केला आहे. साहजिकच बॉलिवूडमधील झगमगाट सोडून सुशांतला शेती का करायची होती, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत हिनेही नेमका हाच प्रश्न विचारत पुन्हा एकदा बॉलिवूडमधील घराणेशाहीवर वार केला आहे. नेहमीप्रमाणे ट्वीट करत तिने अनेक सवाल उपस्थित केले आहेत.

‘2019 या वर्षभरात सुशांतने कोणत्याही सिनेमासाठी शूटींग केले नव्हते. कारण फिल्म माफियांनी त्याच्यावर बहिष्कार टाकला होता. सुशांतच्या वडिलांनी सांगितले की, तो शेती करू इच्छित होता. प्रतिभेचे ‘पॉवर हाऊस’ असलेला आणि  सायन्समधील शानदार करिअर सोडून बॉलिवूडमध्ये आलेला सुशांत अखेर शेती का करू इच्छित होता?’ असा सवाल कंगनाने केला आहे.

रिया चक्रवर्तीवर सुशांतच्या वडिलांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर कंगनाने मीडियावर निशाणा साधला आहे. ‘रिया चक्रवर्तीने सुशांतला मीडिया माफियांची भीती दाखवत त्याला घाबरवले, धमकावले, बॅन करण्याची धमकी दिली. प्रचंड संघर्षाच्या काळात मानसिक आरोग्यासंदर्भातील समस्या होणे स्वाभाविक आहे. हॉलिवूडमधील अनेक कलाकारही यातून गेले आहेत. सुशांतला त्याला बदनाम करण्यासाठी सुरु असलेल्या मोहिमेला सामोरे जाण्याऐवजी मृत्यू पत्करणे अधिक योग्य का वाटले असेल?’ असे तिने दुस-या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीचा वाद चांगलाच तापला आहे. कंगना राणौतने हा मुद्दा लावून धरला आहे.  

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: kangna ranaut asked why did sushant singh rajput want to leave bollywood and do farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.