कंगना राणौतचा 'मणिकर्णिका रिटर्न्स' अडकला वादाच्या भोवऱ्यात, अभिनेत्रीवर चोरीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2021 12:06 PM2021-01-16T12:06:21+5:302021-01-16T12:06:50+5:30

कंगना राणौतचा 'मणिकर्णिका रिटर्न्स'च्या घोषणेनंतर आता कंगनावर चोरीचा आरोप झाला आहे.

Kangana Ranaut's 'Manikarnika Returns' stuck in controversy, actress accused of theft | कंगना राणौतचा 'मणिकर्णिका रिटर्न्स' अडकला वादाच्या भोवऱ्यात, अभिनेत्रीवर चोरीचा आरोप

कंगना राणौतचा 'मणिकर्णिका रिटर्न्स' अडकला वादाच्या भोवऱ्यात, अभिनेत्रीवर चोरीचा आरोप

googlenewsNext

बॉलिवूड क्वीन कंगना राणौतने नुकतीच तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे नाव आहे 'मणिकर्णिका रिटर्न्स: द लिजेंड ऑफ दिद्दा'. मणिकर्णिकामध्ये कंगनाने झाशीच्या राणीची भूमिका निभावली आहे; पण मणिकर्णिकाच्या पुढील भागात कंगना काश्मीरची राणी 'दिद्दा'ची भूमिका साकारणार आहे; पण चित्रपटाच्या घोषणेनंतर आता कंगनावर चोरीचा आरोप झाला आहे. 

कंगना राणौतने 'मणिकर्णिका रिटर्न्स: द लिजेंड ऑफ दिद्दा' चित्रपटाची कथा चोरल्याचा आरोप 'दिद्दा'चे लेखक आशिष कौल यांनी केला आहे. ते म्हणाले, की स्वतः च्या हक्कांसाठी संघर्ष करणारी कंगना माझ्यासारख्या लेखकाच्या हक्कांचे उघडपणे उल्लंघन करते आहे. तिने कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केले असून हे बेकायदेशीर आहे. मला कंगनाचे वागणे समजले नाही. मी याला बौद्धिक चोरी म्हणेल.


आशिष कौल पुढे म्हणाले की, कंगना दावा करू शकते, की 'दिद्दा' हे एक ऐतिहासिक पात्र आहेच पण दिद्दाबद्दल जगातील कोणत्याही इतिहासकारांनी फारसे काही लिहिले नाही. याला फक्त अपवाद फक्त इतिहासकार कल्हान आहेत. इतर कोणत्याही इतिहासकाराने काश्मीरची राणी दिद्दावर मोजून दोन पानेही लिहिली नाहीत. या विषयावर मी सहा वर्षे संशोधन करून ही माहिती जमवली आहे. 


'मणिकर्णिका रिटर्न्स'मध्ये काश्मीरच्या राणी दिद्दाची कथा रेखाटण्यात येणार आहे. चित्रपट निर्माते कमल जैन यांच्यासोबत फोटो शेअर करत कंगना रानौतने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. कमल जैन सोबतचा फोटो शेअर करताना कंगना राणौतने म्हटलं की, 'झाशीच्या राणीसारख्या अनेक वीरांगणांच्या कथेचा साक्षी आपला भारत देश आहे. अशीच आणखी एक समोर न आलेली वीर कथा म्हणजे काश्मीरच्या राणीची, ज्यांनी महमुद गजनवीला एकदा नव्हे तर दोनदा पराभूत केले. लवकरच कमल जैन आणि मी 'मणिकर्णिका रिटर्न्स: दि लिजेंड ऑफ दिद्दा' प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहोत.'

Web Title: Kangana Ranaut's 'Manikarnika Returns' stuck in controversy, actress accused of theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.