kangana ranaut yells at crew member suggesting to use body double video-ram | अन् क्रू मेंबरवर भडकली कंगना राणौत, जुना व्हिडीओ होतोय व्हायरल

अन् क्रू मेंबरवर भडकली कंगना राणौत, जुना व्हिडीओ होतोय व्हायरल

ठळक मुद्देहा व्हिडीओ एका  शूटींगदरम्यानचा आहे. 

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने काल 23 मार्चला आपल्या कुटुंबासोबत वाढदिवस साजरा केला आणि याचनिमित्ताने बेधडक मनाच्या कंगनाचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला. होय, सध्या कंगनाचा हा जुना व्हिडीओ प्रचंड वेगाने व्हायरल होतोय. यात कंगना तिच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये आपल्या एका क्रू मेंबरवर चिडलेली दिसतेय.
हा व्हिडीओ एका  शूटींगदरम्यानचा आहे. यात कंगना तिच्या व्हॅनिटीत बसून शॉटसाठी तयार होतेय. याचदरम्यान एक क्रू मेंबर तिच्याकडे येतो आणि कुठल्या एका सीनसाठी बॉडी डबलचा वापर करावा, असे कंगनाला सुचवतो. कंगना मात्र बॉडी डबल हा शब्द ऐकताच जाम भडकते. 

मी कुठल्याही सीनसाठी बॉडी डबल वापरत नाही. काय करायचे हे मला शिकवू नकोस. बॉडी डबल करू शकते आणि मी नाही, असे तिच्यात काय आहे? असा सवाल ती संतापून करतेय. शिवाय रागारागात बहीण रंगोलीलाही हाक मारते. रंगोली ही कंगनाची मॅनेजर आहे. इतकेच नाही तर रागारागात हातातले पेपर टेबलावर आपटते.

 हा व्हिडिओ एका कँपेनच्या शूटींगचा असल्याचे कंगनाने याआधीच स्पष्ट केले आहे.
या व्हिडीओवरून एक गोष्ट स्पष्ट आहे, ती म्हणजे बॉलिवूडचे अनेक स्टार्स अनेक स्टंटसाठी बॉडी डबलची मदत घेत असताना कंगना मात्र प्रत्येक सीन स्वत: करते. बॉडी डबलचा वापर करणे तिला अजिबात आवडत नाही.
तुम्हाला आठवत असेलच की, मणिकर्णिका- द क्वीनऑफ  झांसी या सिनेमाच्या शूटींगदरम्यान कंगनाला अनेकदा दुखापत झालीय. या चित्रपटातील प्रत्येक स्टंट सीन कंगनाने स्वत: दिलेला आहे.
 

Web Title: kangana ranaut yells at crew member suggesting to use body double video-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.