kangana ranaut thalaivi postponed due to covid 19 | कंगना राणौतच्या 'थलायवी'वर कोरोनाचे ग्रहण, मेकर्सनी सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली

कंगना राणौतच्या 'थलायवी'वर कोरोनाचे ग्रहण, मेकर्सनी सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली

देशात कोरोना व्हायरसची वाढती संख्या बघून कडक निर्बंध लावण्यात आल्या आहेत. परिणामी अनेक बॉलिवूड सिनेमाच्या रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कंगना राणौतचा आगामी सिनेमा 'थलायवी'ची रिलीज डेट ही पुढे ढकलण्यात आली आहे. तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ अभिनेत्री जे. जयललिता यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता आणि चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली होती. 

 लॉकडाउनचं सावट तसंच वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आता प्रदर्शन लांबणीवर पडलं आहे. 'थलायवी' येत्या 23 एप्रिलला थिएटरमध्ये रिलीज  होणार होता.  कोरोना व्हायरसच्या पुन्हा एकदा वाढत्या घटनांमुळे पुन्हा थिएटर बंद होण्याची शक्यता आहे आणि लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निर्मात्यांनी हा निर्णय घेतला असवा. यासंदर्भात निर्मात्यांकडून एक पत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

या सिनेमात जयललिता यांचा अभिनेत्री ते राजकारणी असा प्रवास दाखवण्यात आला आहे. या सिनेमासाठी कंगनाला वजन वाढवावे लागले होते. विशेष म्हणजे, एकदा वजन वाढवून तिला पुन्हा स्लीमट्रीम व्हायचे होते. काही महिन्यात 20 किलो वजन वाढवणे आणि पुन्हा ते घटवणे हे आव्हान कंगनाने स्वीकारले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: kangana ranaut thalaivi postponed due to covid 19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.