kangana ranaut team lashes out at kareena kapoor khan |  ‘आधी या 6 प्रश्नांचे उत्तर दे...’; बेबो नेपोटिजमवर बोलली आणि कंगना राणौतची सटकली  

 ‘आधी या 6 प्रश्नांचे उत्तर दे...’; बेबो नेपोटिजमवर बोलली आणि कंगना राणौतची सटकली  

ठळक मुद्दे नेपोटिजमवर करिना बोलताच कंगना भडकली. तिच्यावतीने तिच्या टीमने एकापाठोपाठ एक असे अनेक ट्वीट्स करत बेबोला धारेवर धरले.

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर चव्हाट्यावर आलेला बॉलिवूडच्या घराणेशाहीचा वाद अद्यापही शमायची चिन्हे नाहीत. गेल्या काही दिवसांत बॉलिवूडमधील घराणेशाहीचा मुद्दा काहीसा नरमला होता. पण अचानक करिना कपूरने या वादात उडी घेतली आणि तिने उडी घेताच कंगना राणौतही अ‍ॅक्टिव्ह झाली. ‘फक्त घराणेशाहीमुळे माझे 21 वर्षांचे करिअर घडले नसते,’ असे करिना म्हणाली. मग काय, करिनाच्या या वाक्याने कंगना भडकली. तिने करिनावर थेट प्रश्नांची सरबत्ती केली. बेबोला तिने एकापाठोपाठ एक असे 6 सवाल केलेत.

काय म्हणाली करिना?
घराणेशाहीमुळे मी बॉलिवूडमध्ये आले असेलही. पण फक्त या जोरावर माझे 21 वर्षांचे करिअर घडले नसते. असे अनेक स्टारकिड्स आहेत, ज्यांना यश मिळू शकले नाही. मी त्यांची यादीच देऊ शकते.  कदाचित तुम्हाला ऐकायला विचित्र वाटेल पण मी सुद्धा संघर्ष केला आहे. खिशात 10 रूपये घेऊन मुंबईत येणाºयांइतका हा संघर्ष कदाचित रंजक नसेल. पण संघर्ष माझ्याही वाट्याला आला. मी आज जे काही आहे ते प्रेक्षकांमुळेच. आज जे लोक आमच्यावर नेपोटिजमचा आरोप करत आहेत, त्यांनीच आम्हाला स्टार बनवले आहे. त्यामुळे अनेकदा मला हा वादच निरर्थक वाटतो. तुम्ही आमचे सिनेमे पाहता म्हणून आम्ही मोठे होतो, असे करिना एका ताज्या मुलाखतीत म्हणाली.

कंगनाचे सवाल

 नेपोटिजमवर करिना बोलताच कंगना भडकली. तिच्यावतीने तिच्या टीमने एकापाठोपाठ एक असे अनेक ट्वीट्स करत बेबोला धारेवर धरले. कृपया या प्रश्नांची उत्तरे देशील का, असे म्हणत या टीमने अनेक सवाल केलेत.

1. तुझ्या बेस्ट फ्रेन्डने (करण जोहर) कंगनाला इंडस्ट्री सोडायला का सांगितले?
2. मोठ्या प्रॉडक्शन हाऊसेजने सुशांतला बॅन का केले होते?
3. कंगनाला ‘witch’ आणि सुशांतला ‘rapist’ का म्हटले गेले/जाते?
4. तुझ्या इको सिस्टिममध्ये कंगना आणि सुशांतला बायपोलर का म्हटले जाते?
5. तुझ्याच सारख्या एका नेपोकिडने लग्नाचे वचन देऊन कंगनाविरोधात केस का केली?
6. कंगना व सुशांतला पार्टीत का बोलवले जात नाही? त्यांच्या कामाचे कौतुक होत नाही?

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: kangana ranaut team lashes out at kareena kapoor khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.