कंगनाच्या लग्नाबाबत दिग्दर्शिका अश्विनी अय्यरने केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 04:23 PM2019-12-24T16:23:04+5:302019-12-24T16:31:20+5:30

पंगा सिनेमाची दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारीदेखील म्हणाली, कंगाना लग्नाची सगळी तयारी केली आहे

Kangana ranaut talks about her marriage plans and groom | कंगनाच्या लग्नाबाबत दिग्दर्शिका अश्विनी अय्यरने केला मोठा खुलासा

कंगनाच्या लग्नाबाबत दिग्दर्शिका अश्विनी अय्यरने केला मोठा खुलासा

Next

कंगना राणौतचा लवकरच बॉक्स ऑफिसवर 'पंगा' सिनेमा रिलीज होणार आहे.  पंगा सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात कंगना एका लग्न झालेल्या कबड्डी खेळाडूची भूमिका साकारणार आहे. इंडिया टिव्हीच्या रिपोर्टनुसार कंगानाला ट्रेलर लॉन्चच्या दरम्यान तिच्या लग्नाच्या प्लॅनबाबत विचारण्यात आले. यावर कंगना म्हणाली, लग्नाचे तर मला माहिती नाही. पण जेव्हा लग्न करेन त्यावेळी तो मुलगा माझ्यापेक्षा जास्त इंटेलिजेंट, सुंदर आणि माझ्यापेक्षा जास्त हुशार असला पाहिजे. ऐवढेच नाही तर पंगा सिनेमाची दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारीदेखील म्हणाली, कंगाना लग्नाची सगळी तयारी केली आहे, कंगनाचे लग्न कुठे होणार आणि लग्नात जेवायला काय मेनू असणार. आता फक्त कंगना योग्य मुलाची वाट बघतेय.   


  कंगनाशिवाय अभिनेत्री नीना गुप्ता आणि पंजाबी अभिनेता जस्सी गिल यांच्याही सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.पंगा'विषयी बोलताना अश्विनी अय्यर तिवारी म्हणाली होती की, 'या सिनेमात कंगना रानौतची बॉडी डबल वापरायची नव्हती. त्यामुळे कंगनाला ट्रेनिंग घ्यायला सांगितले. तर कंगनाने देखील कबड्डी खेळ खूप एन्जॉय केला. यापूर्वी ती कधीच कबड्डी खेळलेली नाही आणि तिच्यासाठी हा खेळ देखील नवा होता. या सिनेमासाठी तिने खूप मेहनत घेतली असून नक्कीच हा सिनेमा रसिकांच्या पसंतीस पात्र ठरेल अशी आशा आहे. 'पंगा' सिनेमा 24 जानेवारी 2019 ला प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Kangana ranaut talks about her marriage plans and groom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app