कंगनाने उडवली महाराष्ट्रातील लॉकडाऊनची खिल्ली; युजर्स म्हणाले, संजय राऊतांची खुर्ची गेल्याशिवाय...! 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 12:35 PM2021-04-16T12:35:38+5:302021-04-16T12:37:37+5:30

Kangana Ranaut on Maharashtra lockdown : हेच म्हणजे महाराष्ट्रातील लॉकडाऊन..., कंगना राणौतने शेअर केला फोटो

kangana ranaut takes a dig at maharashtra lockdown shares a photo on twitter | कंगनाने उडवली महाराष्ट्रातील लॉकडाऊनची खिल्ली; युजर्स म्हणाले, संजय राऊतांची खुर्ची गेल्याशिवाय...! 

कंगनाने उडवली महाराष्ट्रातील लॉकडाऊनची खिल्ली; युजर्स म्हणाले, संजय राऊतांची खुर्ची गेल्याशिवाय...! 

googlenewsNext
ठळक मुद्देअगदी कालपरवा केलेल्या एका ट्विटमध्येही कंगनाने महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधत, महाराष्ट्र सरकारला ‘चंगू मंगू गँग’  म्हटले होते.

कोरोनाचा वाढता प्रकोप रोखण्यासाठी महाराष्ट्रात 15 दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी असली तरी, याला लॉकडाऊनचे नाव देण्यात आले आहे. साहजिकच या लॉकडाऊनला अनेकांचा विरोध आहे. बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत ( Kangana Ranaut) यापैकीच एक. राज्यातील लॉकडाऊनची कंगनाने जोरदार खिल्ली उडवली आहे. ( Kangana Ranaut on Maharashtra lockdown )
कंगनाने ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे आणि महाराष्ट्रातील लॉकडाऊनचा योग्य अर्थ सांगितला.

कंगनाने पोस्ट केलेल्या फोटोत एका दरवाज्यावर कुलूप लागलेले दिसतेय. पण या घराच्या चारही भिंती गायब आहेत. कंगनाने या घराची तुलना महाराष्ट्रातील लॉकडाऊनशी केली आहे.
आता कंगना महाराष्ट्रातील लॉकडाऊनची अशी खिल्ली उडवणार असेल तर तिचीही खिल्ली उडणार. सोशल मीडियावर हेच दिसले़ अनेकांनी या पोस्टच्या निमित्ताने कंगनाचीही मजा घेतली.

नेटक-यांच्या अशा अशा भन्नाट कमेंट्स
कंगनाची पोस्ट वाचून नेटक-यांनी एकापेक्षा एक भन्नाट कमेंट्स केल्यात. संजय राऊतांची खुर्ची केल्याशिवाय ही नाही मानणार, असे एका युजरने कंगनाची मजा घेत लिहिले.

ड्रामा क्वीनकडून यापेक्षा आणखी कशाची अपेक्षा केली जाऊ शकते? अशी खोचक कमेंट एका युजरने केली. ‘कंगना अब चुन चुन कर रोज बदला ले रही है महाराष्ट्र सरकार से,’ अशी कमेंट एका युजरने केली.

अगदी कालपरवा केलेल्या एका ट्विटमध्येही कंगनाने महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधत, महाराष्ट्र सरकारला ‘चंगू मंगू गँग’  म्हटले होते. ‘महाराष्ट्रात लॉकडाऊन लागले का, कोणी मला सांगू शकेल का? हे सेमी लॉकडाऊन आहे की नकली लॉकडाऊन? काय सुरु आहे इथे? कदाचित कोणीच कठोर निर्णय घेऊ इच्छित नाही. डोक्यावर तलवार लटकत असताना चंगू मंगू गँग आपल्या अस्तित्वाची लढाई लढतेय. आपण राहू की नाही, या  चिंतेने त्यांना ग्रासले आहे,’ असे ट्विट कंगनाने केले होते.

Web Title: kangana ranaut takes a dig at maharashtra lockdown shares a photo on twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.