इथेही टिकाव लागणे अवघड आहे...! इन्स्टाग्रामने डिलीट केली पोस्ट, संतापली कंगना राणौत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 02:51 PM2021-05-09T14:51:42+5:302021-05-09T15:04:52+5:30

ट्विटरने अकाऊंट कायमचे सस्पेन्ड केले. यानंतर कंगना इन्स्टाग्रामवर अ‍ॅक्टिव्ह झाली. पण आता इन्स्टाग्रामनेही कंगनाची एक पोस्ट डिलीट केली आणि ती जाम भडकली.

kangana ranaut post deleted by instagram which she shared after covid 19 positive | इथेही टिकाव लागणे अवघड आहे...! इन्स्टाग्रामने डिलीट केली पोस्ट, संतापली कंगना राणौत

इथेही टिकाव लागणे अवघड आहे...! इन्स्टाग्रामने डिलीट केली पोस्ट, संतापली कंगना राणौत

Next
ठळक मुद्देकंगनाने काल ती कोव्हिड 19 पॉझिटीव्ह असल्याची बातमी शेअर केली होती.

कंगना राणौत (Kangana Ranaut) आणि वादाचे जुने नाते आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ती सतत चर्चेत असते. पश्चिम बंगालमधील निवडणूक निकालानंतर कंगनाने ट्विटरवर अतिशय तीव्र शब्दांत पोस्ट लिहिली आणि यानंतर ट्विटरने कंगनाचे अकाऊंट कायमचे सस्पेन्ड करण्यात आले. यानंतर कंगना इन्स्टाग्रामवर अ‍ॅक्टिव्ह झाली. पण आता इन्स्टाग्रामनेही कंगनाची एक पोस्ट डिलीट केली आणि कंगना जाम भडकली. (Kangana Ranaut post deleted by Instagram) 
कंगनाने काल 8 मे रोजी ती कोरोना पॉझिटीव्ह असल्याची बातमी इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. पण तिच्या या पोस्टवरही वाद निर्माण झाला आणि वाद निर्माण होताच इन्स्टाग्रामने तिची ही पोस्ट डिलीट केली. यानंतर कंगना जाम संतापली.

‘इन्स्टाग्रामने माझी एक पोस्ट डिलीट केली़ ज्यात मी कोव्हिड संपवण्याची धमकी दिली होती. माझ्या या पोस्टमुळे कुणाच्या तरी भावना दुखावल्यात. अतिरेकी आणि कम्युनिस्टांबद्दल सहानुभूती असलेले दुखावले, हे तर मी ट्विटरवर पाहिले आहे. पण कोव्हिडचा फॅन क्लब आहे, हे हैराण करणारे आहे. इन्स्टावर दोनच दिवस झालेत. पण इथेही मी आठवड्यापेक्षा अधिक काळ टिकेल, असे वाटत नाहीये,’ असे कंगनाने इन्स्टास्टोरीवर लिहिले आहे.

कोव्हिडबद्दलची पोस्ट...
कंगनाने काल ती कोव्हिड 19 पॉझिटीव्ह असल्याची बातमी शेअर केली होती. ‘ गेल्या काही दिवसांपासून माझ्या डोळ्यात सौम्य जळजळ होत होती आणि थोडासा अशक्तपणा जाणवत होतो. हिमाचलला जाण्याचा बेत होता. त्यामुळे काल माझी कोव्हिड टेस्ट झाली आणि आज मी पॉझिटीव्ह आले. मी स्वत:ला क्वारंटाइन केले आहे. हा व्हायरस माझ्या शरीरात आहे, याची मला कल्पना नव्हती. पण आता मला कळलेय आणि मी या व्हायरसचा समूळ नायनाट करणार आहे. कृपया, या व्हायरसला अजिबात घाबरू नकोस. तुम्ही जितके घाबराल तितका तो घाबरवेल. चला तर, या कोव्हिड 19 ला नष्ट करूयात. एका फ्लूशिवाय हा दुसरा काहीही नाही. हर हर महादेव,’ असे तिने म्हटले होते.


 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: kangana ranaut post deleted by instagram which she shared after covid 19 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app