सेलिब्रिटी मंडळी नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. मग ते स्वतःविषयीचं एखादं कारण असो किंवा मग त्यांच्या सिनेमाविषयी असो ते नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असतात. गेल्या काही दिवसांपासून कंगणा राणौत बरीच चर्चेत आहे. कोणत्या ना कोणत्या मुद्द्याला हात घालत त्यात वाद ओढावून घेत ती चर्चेत असते. नुकताच सोशल मीडियावर तिने एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो तिच्या आगामी सिनेमासाठी तयारी करत असल्याचा आहे. या फोटोत बॉक्सिंगचे धडे घेण्यात कंगणा बिझी असल्याचे पाहायला मिळत आहे.

 

 'थलायवी' बायोपिक आणि 'धाकड' या दोन बड्या प्रोजेक्टमध्ये कंगणा दिसणार आहे. 'थलायवी'साठी तिने तितकीच मेहनत घेतली होती. त्यानंतर आता धाकडसाठी मेहनत घेताना दिसत आहे. यापूर्वीही आपण कंगणाचा हा स्पोर्टी अंदाज तर 'पंगा' सिनेमात पाहिला आहे. आता थेट बॉक्सिंग ग्लब्ज घालून प्रतिस्पर्ध्याला चीत करण्यासाठी ती आतुर झालीय. 


आपल्या रोकठोक आणि बिनधास्त अदांनी तिने फॅन्सना क्लीन बोल्ड केलेलंच आहे. मात्र तिचा हा रफ एंड टफ अंदाज पाहून चाहते फुल ऑन फिदाही होतात. किक बॉक्सिंग ट्रेनरकडून कंगणा किक बॉक्सिंगची ट्रेनिंग घेतेय. आपल्या आगामी सिनेमासाठी ही ट्रेनिंग सुरु आहे.  या सिनेमात कंगणा वेगळ्या लूकमध्ये पाहायला मिळणार आहे. 'धाकड' या सिनेमातील आपल्या या भूमिकेसाठी  बरीच मेहनत घेत आहे. खेळाडूप्रमाणे फिट दिसण्यासाठी तिने आपल्या फिटनेसवर बरेच कष्ट घेतले आहेत. त्यामुळे सिनेमातील कंगणाची ही भूमिका थोडी खास असणार आहे. 


कंगना तिच्या आगामी ‘तेजस’ या सिनेमामध्ये भारतीय वायुसेनेच्या लढाऊ वैमानिकाची भूमिका साकारत आहे. या सिनेमाचे शूटिंग डिसेंबरपासून सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘तेजस’ आणि ‘धाकड’पूर्वी कंगना ‘थलायवी’ सिनेमात तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

बिझी शेड्यअल असले तरीही आधीपासूनच फिटनेसची काळजी घेत असल्याचं ती आवर्जून सांगते. तिच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक महिलांच्या हाती बॉक्सिंग ग्लब्ज दिसले तर चक्रावून जाऊ नका. बॉलिवूडची क्वीन कंगणा राणौतला 'मणिकर्णिका'च्या यशानंतर बॉलिवूडची पहिली अ‍ॅक्शन हिरोईन म्हणूनही तिला ओळखले जाते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Kangana Ranaut 'multitasks' and starts preparation for 'Dhaakad' along with 'Thalaivi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.