हिंदूंचं रक्त इतकं स्वस्त झालंय का? कंगना राणौतनं रडत रडत केली राष्ट्रपती राजवटीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 02:25 PM2021-05-04T14:25:39+5:302021-05-04T14:28:10+5:30

Kangana Ranaut hurt over Bengal violence : आता हा देश देशद्रोही चालवणार का? निष्पापांची हत्या होतेय आणि आपण फक्त धरणे आंदोलन करणार का? असे कंगना या व्हिडीओत म्हणतेय.

Kangana Ranaut hurt over Bengal violence, crying out for President’s rule |  हिंदूंचं रक्त इतकं स्वस्त झालंय का? कंगना राणौतनं रडत रडत केली राष्ट्रपती राजवटीची मागणी

 हिंदूंचं रक्त इतकं स्वस्त झालंय का? कंगना राणौतनं रडत रडत केली राष्ट्रपती राजवटीची मागणी

googlenewsNext
ठळक मुद्देकंगनाने आज सकाळी एक ट्विट केले. या ट्विटमध्ये तिने ममता बॅनर्जींची तुलना त्राटिका या राक्षसीसोबत केली. 

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर कंगना राणौतने ( Kangana Ranaut) काही वादग्रस्त ट्विट केले आणि ट्विटरने तिला जोरदार दणका देत, तिचे अकाऊंट सस्पेंड केले. अशात कंगनाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत, अगदी रडत रडत देशात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली आहे.
या व्हिडीओद्वारे कंगनाने भारत सरकारला संदेश दिला आहे. या व्हिडीओत कंगनाला अश्रू आवरत नाही. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर कंगनाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. ( Kangana Ranaut hurt over Bengal violence, crying out for President’s rule)

काय म्हणाली कंगना...

मित्रांनो, तुम्ही बघताय की बंगालमधून खूप डिस्टर्ब करणा-या बातम्या येत आहेत. लोकांचे खून पडत आहेत. गँगरेप होत आहेत. घरांना आगी लावल्या जात आहेत. पण कोणताच लिबरल काहीही बोलायला तयार नाही. बीबीसी वर्ल्ड, टेलिग्राफ, टाईम्स कोणताही इंटरनॅशनल मीडिया हे कव्हर करायला तयार नाही. मला कळत नाहीये की भारताविरोधात हा कोणता कट रचला जातोय? हिंदूंचे रक्त इतके स्वस्त झालेय का? आपण देशद्रोहींना का इतके घाबरतोय? मला माहितीये, आंतरराष्ट्रीय दबाव आहे. आपण वाईट पद्धतीने फसलो आहोत. पण आता देशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली आहे. जवाहरलाल नेहरूंनी 12 वेळा राष्ट्रपती राजवट लागू केली होती. इंदिरा गांधींनी 50 वेळा आणि मनमोहन सिंग यांनी 10-12 वेळा राष्ट्रपती राजवट लागू केली होती. मग आपण कुणाला घाबरतोय? आता हा देश देशद्रोही चालवणार का? निष्पापांची हत्या होतेय आणि आपण फक्त धरणे आंदोलन करणार? मी सरकारला सांगू इच्छिते की, कठोरातील कठोर पाऊल उचला, असे कंगना या व्हिडीओत म्हणतेय.

त्राटिकेसोबत केली ममतांची तुलना

कंगनाने आज सकाळी एक ट्विट केले. या ट्विटमध्ये तिने ममता बॅनर्जींची तुलना त्राटिका या राक्षसीसोबत केली. निवडणूक निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये भडकलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या ट्विटमध्ये तिने लिहिले, ‘मी चूक होती. ती रावण नाही. रावण महान राजा होता. त्याने जगातील सर्वात श्रीमंत देश निर्माण केला होता. महान प्रशासक, बुद्धिमान, वीणावादक असा शक्तिशाली राजा होता. पण ही रक्ताची भुकेली राक्षसीण त्राटिका आहे. ज्या लोकांनी हिला मत दिले, त्यांचेही हात रक्ताने माखलेले आहेत.’
याआधी केलेल्या ट्विटमध्ये कंगनाने ममता बॅनर्जींची तुलना रावणाशी केली होती.

Web Title: Kangana Ranaut hurt over Bengal violence, crying out for President’s rule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.