कंगना राणौतने उर्मिला मातोंडकरला म्हटले होते 'सॉफ्ट पॉर्न स्टार', आता राम गोपाल वर्माने दिली ही रिअ‍ॅक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 12:18 PM2021-05-17T12:18:15+5:302021-05-17T12:18:45+5:30

बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्माने कंगना राणौतच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे, ज्यात तिने उर्मिला मातोंडकरला 'सॉफ्ट पॉर्न स्टार' असे संबोधले होते.

Kangana Ranaut had called Urmila Matondkar a 'soft porn star', now Ram Gopal Varma has reacted | कंगना राणौतने उर्मिला मातोंडकरला म्हटले होते 'सॉफ्ट पॉर्न स्टार', आता राम गोपाल वर्माने दिली ही रिअ‍ॅक्शन

कंगना राणौतने उर्मिला मातोंडकरला म्हटले होते 'सॉफ्ट पॉर्न स्टार', आता राम गोपाल वर्माने दिली ही रिअ‍ॅक्शन

Next

बॉलिवूडची क्वीन कंगना राणौतने मागील वर्षी उर्मिला मातोंडकरला सॉफ्ट पॉर्न स्टार म्हटले होते. त्यावर उर्मिलाने प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, ती  यामुद्द्यावर कंगनाच्या तोंडाला लागू शकत नाही कारण यामुळे तिला जास्त महत्त्व मिळेल. ज्याची ती अजिबात हकदार नाही. आता दिग्दर्शक राम गोपाल वर्माने सांगितले की, कंगनाच्या या वक्तव्यामुळे तो खुप दुखावला गेला. 


राम गोपाल वर्मानेउर्मिला मातोंडकरला १९९५ साली रिलीज झालेला चित्रपट रंगीलामध्ये संधी दिली होती. राम गोपाल वर्मा म्हणाले की, कंगना राणौतचे विधान हास्यास्पद आहे आणि यातून जाहीर होते की ती उर्मिला बद्दल काय विचार करते. त्यांनी बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, हो. कंगनाच्या या विधानामुळे मला त्रास होता. पण मी जे म्हणतोय की अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला असले पाहिजे पण ते आक्रमक नसलं पाहिजे.


राम गोपाल वर्माने पुढे म्हटले की, जर यामुळे कोणाला त्रास होत नाही, तर बोलण्यात काय अर्थ आहे? जेव्हा तुम्ही म्हणता की, तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गरज आहे हे तेव्हा होते जेव्हा हे कोणाला तरी दुखावते. मी फार कमी लोकांबद्दल बोलतो. मला विश्वास आहे की ते नाराज होतात.


राम गोपाल वर्मा म्हणाला की, मी असे तेव्हा करतो जेव्हा मला दुसऱ्या कोणाचे आणि त्याच्याबद्दल काही बोलायचा अधिकार नसतो. हे सर्व सोशल मीडियाचे पॉइंट आहे. कंगना, उर्मिला मातोंडकरबद्दल काय विचार करते, हे तिचा समजूतदारपणा आहे. याबद्दल मला काहीच म्हणायचे नाही.

पण एक दिग्दर्शक म्हणून उर्मिला आणि तिचे चांगले काम मी जाणतो. मला माहित आहे की ती एक चांगली कलाकार आहे, असे राम गोपाल वर्मा म्हणाला.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Kangana Ranaut had called Urmila Matondkar a 'soft porn star', now Ram Gopal Varma has reacted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app