kangana ranaut gets brutally trolled for sharing onion picture in ashtami parsadam | नैवेद्याच्या ताटात कांदा पाहून कंगना राणौतवर भडकले लोक ; म्हणाले, तू कसली हिंदू?

नैवेद्याच्या ताटात कांदा पाहून कंगना राणौतवर भडकले लोक ; म्हणाले, तू कसली हिंदू?

ठळक मुद्देदीदीजी, अष्टमीला कांदा वर्ज्य आहे, असे एका युजरने लिहिले. मैया के भोग में प्याज का क्या काम? अशा शब्दांत एका युजरने आपला राग व्यक्त केला.

कंगना राणौत (Kangana Ranaut) सध्या ट्रोल होतेय. कारण काय तर तिने शेअर केलेला एक फोटो. होय, नवरात्रीच्या मुहूर्तावर आज दुर्गाष्टमीच्या दिवशी घराच्या नैवेद्याच्या थाळीचा एक फोटो कंगनाने शेअर केला आणि हा फोटो बघताच लोकांनी तिला ट्रोल करणे सुरू केले. नैवेद्याच्या ताटात कांदा पाहून खरे तर लोक भडकले. लोकांनी वेगवेगळ्या कमेंट्स करत, कंगनाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. अर्थात कंगनानेही या ट्रोलर्सला जशास तसे उत्तर दिले.

कंगनाच्या घरी आज दुर्गाष्टमीची पूजा झाली. यावेळी विविध पक्वानांनी सजलेल्या नैवेद्याच्या थाळीचा फोटो तिने शेअर केला. या थाळीत शिरा, पुरी, रायता, छोले आणि सोबत कांदा आणि मिरची असे सगळे पदार्थ होते. हा फोटो शेअर करत, कंगनाने चाहत्यांना अष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. ‘अष्टमीचे व्रत असेल आणि घरी प्रसादाची अशी सजलेली थाळी असेल तर...,’ असे तिने हा फोटो शेअर करताना लिहिले. मात्र हा फोटो पाहून लोक हैराण झालेत.

दीदीजी, अष्टमीला कांदा वर्ज्य आहे, असे एका युजरने लिहिले. मैया के भोग में प्याज का क्या काम? अशा शब्दांत एका युजरने आपला राग व्यक्त केला. नवरात्रात कांदा कोण खातं? कशी हिंदू आहेस तू? असा सवाल एका युजरने कंगनाला केला. ‘तुम्हारी हरकत बता रही है, तुम्हारा मजहब नया नया है,’ असे एका युजरने लिहिले.

आता इतके ट्रोल झाल्यानंतर कंगना गप्प कशी राहणार? ट्रोलर्सला तिनेही उत्तर दिले. ‘हमारा मजहब बडा फ्लेग्जिबल है जी. बंगाल में तो दुर्गा पूजा में प्याज ही नहीं मीट और मछली भी खा सकते है... कोई फतवा नहीं जी... ऐश करो ऐश’, असे लिहित तिने ट्रोलर्सला गप्प करण्याचा प्रयत्न केला.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: kangana ranaut gets brutally trolled for sharing onion picture in ashtami parsadam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.