kangana ranaut criticised torn american jeans then people shared old photo of the actress and troll her | इसको बोलो रामदेव का जीन्स पहने...! दीपिकाला डिवचू पाहणाऱ्या कंगनाला लोकांनीच दाखवला आरसा

इसको बोलो रामदेव का जीन्स पहने...! दीपिकाला डिवचू पाहणाऱ्या कंगनाला लोकांनीच दाखवला आरसा

ठळक मुद्दे दीपिकाने अलीकडे एका अमेरिकन जीन्स ब्रँडची जाहिरात केली, यावरूनच कंगनाने दीपिकाला डिवचले होते.

नुकताच कंगना राणौतने दीपिका पादुकोणवर निशाणा साधला होता. कारण काय तर एका जीन्सची जाहिरात. दीपिकाने नुकतीच एका अमेरिकन जीन्स ब्रँडची जाहिरात केली. नेमक्या याच जाहिरातीवरून कंगनाने अप्रत्यक्षपणे दीपिकाला लक्ष्य केले होते. फाटकी जीन्स अन् चिंधी ब्लॉऊज..., अशा शब्दांत कंगनाने अप्रत्यक्षपणे दीपिकाला सुनावले होते. पण आता दीपिकाला सुनावणारी कंगना स्वत:च ट्रोल होतेय. होय, दीपिकाच्या जीन्सची खिल्ली उडवणा-या कंगनाला युजर्सनी चांगलेच सुनावले आहे.

इतकेच नाही, सोशल मीडियावर कंगनाच्या फाटक्या जीन्समधील फोटोंचा अख्खा अल्बम खुला केला आहे. ढोंगीपणाचा, दांभिकतेचा कळस, असे लिहित युजर्सनी कंगनाचे पाश्चात्य कपड्यांमधील फोटो शेअर केलेत. इतकी मोठी देशभक्त आहे तर हिला रामदेव बाबाची जीन्स घाल म्हणावं, असे एका युजरने लिहिले.
 एकंदर काय तर दीपिकाला डिवचणे कंगनाला चांगलेच महागात पडले.

काय म्हणाली होती कंगना?
 कंगनाने एक फोटो शेअर केला होता.  1885 सालच्या या फोटोत भारत, जपान व सीरियाच्या पहिल्या परवानाधारक महिला डॉक्टर्स असल्याचा दावा करण्यात आला होता. हा फोटो ट्वीट करत कंगनाने लिहिले होते, ‘जुन्या महिलांच्या सन्मानार्थ ट्वीट. या महिलांनी केवळ आपले व्यक्तिमत्त्व सिद्ध केले नाही तर  सभ्यता, संस्कृती व देशासाठी काम केले. आज अशा लोकांचे फोटो काढायचे झाल्यास त्या केवळ फाटलेल्या अमेरिकन जीन्स व चिंधी झालेले ब्लाऊज घालून केवळ अमेरिकन मार्केटींगचे प्रतिनिधित्व करताना दिसतील.’ आपल्या या ट्वीटमधून कंगनाने अप्रत्यक्षपणे दीपिकाला टोला लगावला होता. दीपिकाने अलीकडे एका अमेरिकन जीन्स ब्रँडची जाहिरात केली, यावरूनच कंगनाने दीपिकाला डिवचले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: kangana ranaut criticised torn american jeans then people shared old photo of the actress and troll her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.