ठळक मुद्देकंगनाने काही दिवसांपूर्वी ‘मुंबई ही आपल्याला पाकव्याप्त काश्मीरसाखी वाटते’, असे म्हटले होते. तिच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले होते. 

चित्रपटांपेक्षा आपल्या परखड वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारी कंगना राणौत पुन्हा एकदा ‘आर या पार’च्या मूडमध्ये दिसली. आज तिने दिग्दर्शक अनुराग कश्यपला अटक करण्याची मागणी केली. इतकेच नाही तर या निमित्ताने ‘मुंबईत हे काय ‘गुंडाराज’ सुरु आहे?’ असा सवाल करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही तिने निशाणा साधला. उद्धव ठाकरे जगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्री असल्याचे ती म्हणाली.

अभिनेत्री पायल घोषने अनुराग कश्यपवर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप करत, एफआयआर दाखल केला आहे. अद्याप मुंबई पोलिसांनी याप्रकरणी अनुरागवर कोणतीही कारवाई केली नाही. या पार्श्वभूमीवर कंगनाने अनुराग, मुंबई पोलिस व महाराष्ट्रातील ठाकरे सरकारवर भडास काढली.


‘ अनुरागविरोधात बलात्काराच्या आरोपात एफआयआर दाखल झाला असताना मुंबई पोलिसांनी अद्याप त्याला अटक का केली नाही? महाराष्ट्र सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करणा-या  साहिल चौधरीला (साहिल एक युट्यू ब्लॉगर व मॉडेल आहे. सुशांत प्रकरणावरून त्याने महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांवर आरोप केले होते.) मात्र एफआयआर दाखल होताच तुरुंगात पाठवले गेले. पायल घोषसोबत लैंगिक गैरवर्तन करणारा अनुराग मात्र मोकाट फिरतो आहे. हे काय सुरु आहे?’, असे ट्विट कंगनाने केले.
कंगनाने आपल्या ट्विटमध्ये साहिल चौधरीच्या नावाचा उल्लेख केला आहे. साहिल एक युट्यूबर आहे. अलीकडे मुंबई पोलिसांनी त्याला आक्षेपार्ह भाषेत एक व्हिडीओ अपलोड केल्याबद्दल अटक केली आहे. एका महिला वकीलाने त्याच्याविरोधात एफआयआर दाखल केला होता. 

मुंबई हे काय ‘गुंडाराज’ सुरु आहे?
आपल्या दुस-या ट्विटमध्ये कंगनाने ठाकरे सरकारला लक्ष्य केले.
‘मुंबईत हे काय गुंडाराज सुरु आहे? जगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांना व त्यांच्या टीमला कोणीही प्रश्न विचारत नाही. त्यांना आमच्यासोबत काय करायचे आहे? आमची घर तोडणार, आम्हाला मारणार?  यासाठी कोण उत्तरदायी आहे?’ असे या ट्विटमध्ये ती म्हणाली.

कंगनाचा ‘पंगा’
कंगनाने काही दिवसांपूर्वी ‘मुंबई ही आपल्याला पाकव्याप्त काश्मीरसाखी वाटते’, असे म्हटले होते. तिच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले होते. यानंतर शिवसेना शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगना यांच्यात तर ट्विटर वॉर रंगले होते. त्यानंतर ‘हिंमत असेल तर मला अडवून दाखवा मी 9 सप्टेंबरला मुंबईत येते आहे,’असे आव्हान कंगनाने दिले होते.  या सगळ्या वादादरम्यान केंद्र सरकारने कंगनाला वाय दजार्ची सुरक्षाही पुरवली होती. कंगना 9 सप्टेंबरला मुंबईत आली त्याचदिवशी सकाळी तिच्या आॅफिसचा काही भाग अनधिकृत ठरवत बीएमसीने त्यावर बुलडोजर चालवला होता. बीएमसीच्या या कारवाईविरोधात कंगनाने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

बाबो! कंगनाने मैत्रिणीच्या बॉयफ्रेन्डला केलं होतं पहिलं किस, म्हणाली - विचित्र होता तो अनुभव...

सोना महापात्राने कंगनाला झापलं, म्हणाली - 'ती दुसऱ्यांसाठी कधीच उभी राहिली नाही'

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Kangana Ranaut, calls Uddhav Thackeray 'incompetent cm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.