‘इंडिया’ हे नाव गुलामीचं प्रतिक, ते बदला...! कंगना राणौतची पोस्ट पुन्हा चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 01:17 PM2021-06-23T13:17:01+5:302021-06-23T13:17:56+5:30

कंगना राणौतने आता नव्या वादाला जन्म दिला आहे. होय, कंगनाची ताजी पोस्ट पुन्हा एकदा चर्चेत आहे.

Kangana Ranaut calls for abolition of slave name says india should be called bharat instead | ‘इंडिया’ हे नाव गुलामीचं प्रतिक, ते बदला...! कंगना राणौतची पोस्ट पुन्हा चर्चेत

‘इंडिया’ हे नाव गुलामीचं प्रतिक, ते बदला...! कंगना राणौतची पोस्ट पुन्हा चर्चेत

Next
ठळक मुद्देकू अ‍ॅपवरही तिने याबद्दल लिहिले आहे. पाश्चिमात्य देशांचे अनुकरण न करता आपण सर्वांनी योग, वेद आणि गीता यांचे अनुकरण करणे गरजेचे असल्याचे तिने म्हटलेय.

कंगना राणौतने (Kangana Ranaut) आता नव्या वादाला जन्म दिला आहे. होय, कंगनाची ताजी पोस्ट पुन्हा एकदा चर्चेत आहे. या पोस्टमध्ये कंगनाने ‘इंडिया’ हे नाव बदलून ‘भारत’ करण्याची मागणी तिने केली आहे.
इंडिया हे नाव गुलामगिरीचे प्रतिक आहे. हे नाव बदलून भारत करण्याची गरज असल्याचे तिने म्हटले आहे. ‘भारत’ या शब्दाची फोड करून तिने याचा अर्थही सांगितला आहे.
कंगनाने इन्स्टाग्रामवर दोन स्टोरी पोस्ट केल्या आहेत. यात तिने भारत व इंडिया यांच्यातील फरक दर्शवला आहे. (Kangana Ranaut calls for abolition of slave name says india should be called bharat instead)

‘ब्रिटीशांनी आपल्याला  इंडिया गुलामीचे नाव दिले, जे गुलामीचे प्रतिक आहे. ज्याचा अर्थ केवळ सिंधू नदीच्या पूर्वेकडील देश असा होतो. आपण एखाद्या लहान मुलाला  लहान नाक, दुसरा मुलगा  किंवा त्याहून वाईट म्हणजे  सी-सेक्शन अशा नावाने उल्लेख करू का? हे कसलं नाव आहे?  भारत या शब्दांचा अर्थ मी तुम्हाला सांगू इच्छिते.  भारत हा संस्कृत शब्द आहे. भा म्हणजे भाव. र म्हणजे राग आणि त म्हणजे ताल असा आहे. गुलाम होण्याआधी आपण सांस्कृतिक आणि कलात्मकदृष्ट्या खूपच विकसित होतो. भारत तेव्हाच पुढे जाऊ शकतो, जेव्हा तो आपली प्राचीन सभ्यता व संस्कृतीवर विश्वास करेल. प्रत्येक नावाला एक अर्थ असतो. ब्रिटीशांना हे माहित होते आणि म्हणून त्यांनी केवळ या देशालाच नाही तर येथील लोकांना आणि ऐतिहासिक वास्तूंनाही नाव दिले. त्यामुळे हे नाव बदलायला हवं. सन्मान परत मिळवण्याची वेळ आता आलीये, असे कंगनाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

कू अ‍ॅपवरही तिने याबद्दल लिहिले आहे. पाश्चिमात्य देशांचे अनुकरण न करता आपण सर्वांनी योग, वेद आणि गीता यांचे अनुकरण करणे गरजेचे असल्याचे तिने म्हटलेय. या पोस्टमध्येही तिने इंडिया हे नाव बदलून भारत करण्याचा सल्ला दिला आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Kangana Ranaut calls for abolition of slave name says india should be called bharat instead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app