Kangana Ranaut brother’s engagement | SEE PICS : कंगना राणौतच्या घरी लवकरच वाजणार सनईचौघडे

SEE PICS : कंगना राणौतच्या घरी लवकरच वाजणार सनईचौघडे

ठळक मुद्देकंगना लवकरच जयललिता यांच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिच्या घरी लवकरच सनईचौघडे वाजणार आहेत. होय, गत शुक्रवारी कंगनाच्या घरी साखरपुडा झाला. यावेळी कंगनाची बहीण रंगोली व कुटुंबीयांनी धम्माल मज्जा केली. आता हा साखरपुडा कुणाचा तर कंगनाच्या भावाचा. होय, कंगना लवकरच नणंद बनणार आहे. कंगनाचा भाऊ अक्षत राणौत याचा गर्लफ्रेन्ड ऋतुसोबत साखरपुडा पार पडला. लवकरच दोघेही लग्नबंधनात अडकतील.
भावाच्या साखरपुड्यात कंगना गोल्डन कलरच्या साडीत दिसली. यावेळी शॅम्पेनची बॉटल उडतानाचा तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

कंगनाची बहीण रंगोली हिने या सोहळ्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कंगना राणौतच्या टीमनेही या सोहळ्याचे काही फोटो पोस्ट केले आहेत. 

या सोहळ्याला कंगनाच्या अतिशय जवळचे कुटुंबीय व मित्रमंडळी हजर होती. चित्रपटसृष्टीतील व अन्य क्षेत्रातील कुठल्याही सेलिब्रिटीला या सोहळ्योच निमंत्रण नव्हते. हा एक कौटुंबिक सोहळा होता.
ऋतु व अक्षत दोघेही दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत होते. यानंतर दोन्ही कुटुंबाच्या संमतीने हे कपल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
कंगनाच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास, लवकरच ती जयललिता यांच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Kangana Ranaut brother’s engagement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.