ठळक मुद्देकमलने  बेखुदी शिवाय रंग,बाली उमर को सलाम, रॉक डान्सर, हम सब चोर है, कर्कश, व्हिक्टोरिया नंबर 203 अशा अनेक चित्रपटांत काम केले.

एखाद्या व्यक्तिच्या वाढदिवसालाच आई-वडिलांचा मृत्यू व्हावा, यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते?  असा विचारही आपल्याला करवत नाही. पण एका बॉलिवूड अभिनेत्यासोबत नेमके हेच घडले. या अभिनेत्याचे नाव आहे कमल सदाना.

21  ऑक्टोबर 1970 रोजी जन्मलेल्या या अभिनेत्याचा आज वाढदिवस. कमल सदाना हा अभिनेता अनेकांच्या विस्मृतीत गेला असेल. 1992 साली ‘बेखुदी’ या चित्रपटात कमल सदाना दिसला होता. यात त्याची हिरोईन होती काजोल. होय, काजोलचा हा पहिला चित्रपट होता.

 या चित्रपटानंतर काजोलने आपल्या फिल्मी करिअरमध्ये बराच मोठा पल्ला गाळला. पण या चित्रपटातील तिचा हिरो अर्थात कमल सदाना मात्र काळासोबत फिल्म इंडस्ट्रीतून गायब झाला. 

कमल सदाना आता 49 वर्षांचा झाला आहे. त्याने अभिनय सोडून अनेक वर्षे उलटली आहेत. कमलने पर्सनल लाईफमध्ये अनेक संकटांचा सामना केला. त्याचे वडिल बृज सदाना यांनी कमलच्या डोळ्यांसमोर त्याच्या आई व बहीणीची हत्या केली होती. वडिलांनी कमलवरही गोळी चालवली होती. पण या हल्ल्यातून कमल थोडक्यात बचावला होता. कमलच्या 20 व्या वाढदिवसाच्या दिवशी ही घटना घडली होती.

कमलने एका मुलाखतीत याबद्दल सांगितले होते. माझ्या आईवडिलांमध्ये सतत भांडणे व्हायची. त्यादिवशी माझा वाढदिवस होता. माझ्या 20 व्या वाढदिवसाच्या दिवशीच माझ्या वडिलांनी आधी आईवर आणि नंतर माझ्या बहिणीवर गोळ्या झाडल्या. त्या दोघींचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. नंतर माझ्या वडिलांनी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. हे सगळे माझ्या डोळ्यांसमोर घडले. आई व बहिणीच्या हत्येचे दृश्य अनेकवर्षे माझ्या डोळ्यांसमोर येई. मी यानंतर अनेक वर्षे डिप्रेशनमध्ये गेलो होतो. विशेष म्हणजे, वडिलांनी असे का केले, याचे उत्तर आजही कमलकडे नाही.


कमलने  बेखुदी शिवाय रंग,बाली उमर को सलाम, रॉक डान्सर, हम सब चोर है, कर्कश, व्हिक्टोरिया नंबर 203 अशा अनेक चित्रपटांत काम केले.
कमल सध्या दिग्दर्शक क्षेत्रात सक्रीय आहे. 2014 मध्ये प्रदर्शित ‘Roar’ या सिनेमाचे दिग्दर्शन त्याने केले होते. अ‍ॅक्टिंग सोडून मी आनंदी आहे, असे कमल अलीकडे म्हणाला होता.


Web Title: kamal sadanah birthday special and career struggle
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.