kamal r khan angry on sunny deol son karan deol tweet viral | अन् सनी देओलचा मुलगा करण देओलवर भडकला केआरके; वाचा काय आहे कारण   

अन् सनी देओलचा मुलगा करण देओलवर भडकला केआरके; वाचा काय आहे कारण   

ठळक मुद्देकरणच्या ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५.६० कोटी रुपयांची कमाई केली आहे.

सनी देओलचा मुलगा करण देओल याने नुकताच ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून डेब्यू केला. स्वत: सनी देओलने मुलाचा चित्रपट दिग्दर्शित केला. तर धर्मेन्द्र यांनी नातवाच्या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. तूर्तास या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. पण करणच्या अभिनयाची मात्र अनेकांनी प्रशंसा केली आहे. अपवाद फक्त कमाल आर खान याचा. होय, नुकतेच असे काही घडले की कमाल आर खान अर्थात केआरके  करण देओलवर जाम भडकला. इतका की, त्याने सोशल मीडियावर आपला हा संताप बोलून दाखवला.
‘आज मी एअरपोर्टवर करण देओलला भेटलो. पण करणने साधे मला हॅलो म्हणण्याचेही सौजन्य दाखवले नाही. मी त्याच्यापेक्षा मोठा आहे, नंबर एकचा समीक्षक आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, हा मुलगा (करण देओल) केवळ अ‍ॅक्टिंगमध्ये कमजोर नाही तर त्याच्यात अंहकारही आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये हा कधीच यशस्वी होऊ शकत नाही...,’असे ट्वीट केआरकेने केले.

(करण देओल)

केआरके हा त्याच्या वादग्रस्त ट्वीटसाठी ओळखला जातो. काही दिवसांपूर्वी त्याने जावेद जाफरीचा मुलगा मिजान जाफरी याच्याबद्दलही असेच वादग्रस्त ट्वीट केले होते. ‘मेकर्स केवळ घराणेशाहीपोटी नॉन टॅलेंटेड आणि हॉरीबल दिसणा-या अ‍ॅक्टर्सला लॉन्च करणार असतील तर हा गुन्हा आहे. पब्लिक आपला पैसा अशा डफर अ‍ॅक्टर्सला पाहण्यासाठी खर्च करणार नाही. लोकांना मूर्ख बनवणे सोडा,’ असे ट्वीट केआरकेने मिजान जाफरीला उद्देशून केले होते. ’मिजानने संजय लीला भन्साळींची भाची शर्मिन सहगल हिच्यासोबत ‘मलाल’ या चित्रपटातून डेब्यू केला होता. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: kamal r khan angry on sunny deol son karan deol tweet viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.