ठळक मुद्देअमलाने १९९२ मध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुनसोबत लग्न केले. अमलाचे हे पहिले लग्न असले तरी नागर्जुनचे हे दुसरे लग्न होते.

कमल हासन यांचा पुष्पक हा चित्रपट तुम्हाला आठवतोय का? या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच व्यवसाय केला होता. या चित्रपटातील कमल हासन यांच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. या चित्रपटाने अनेक पुरस्कार देखील मिळवले होते. एवढेच नव्हे तर या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारावर देखील मोहोर उमटवली होती. या चित्रपटाला आज अनेक वर्षं झाली असली तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली  नाही. या चित्रपटात कमल हासन यांच्यासोबत आपल्याला अमला ही अभिनेत्री पाहायला मिळाली होती. अमलाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. तुम्हाला माहीत आहे का, अमला ही एका सुपरस्टार अभिनेत्याची पत्नी असून तिचा मुलगा देखील आता अभिनेता बनला आहे.

अमलाने १९९२ मध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुनसोबत लग्न केले. अमलाचे हे पहिले लग्न असले तरी नागर्जुनचे हे दुसरे लग्न होते. नागार्जुनचे पहिले लग्न लक्ष्मी डग्गूबतीसोबत झाले होते. पण १९९० मध्ये त्या दोघांचा घटस्फोट झाला. लक्ष्मी आणि नागार्जुन यांना नागा चैतन्य हा मुलगा असून तो प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याचे लग्न अभिनेत्री समंथासोबत झाले आहे तर अमला आणि नागार्जुन यांच्या मुलाचे नाव अखिल आहे. अखिलने देखील त्याच्या आई वडिलांप्रमाणे अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

अमला आणि नागार्जुन यांच्या लग्नानंतर काही वर्षांनंतर नागार्जुन अभिनेत्री तब्बूच्या प्रेमात पडला होता आणि त्यामुळे तब्बू अधिकाधिक काळ हैद्राबादमध्ये राहात होती. नागार्जुन आणि तब्बूचे अफेअर असले तरी त्याला काहीही केल्या अमलाला घटस्फोट द्यायचा नव्हता. या नात्यात काहीच भविष्य नाही याची जाणीव झाल्याने तब्बूने नागार्जुनपासून दूर राहाणे पसंत केले असे म्हटले जाते. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: kamal haasan pushpak movie co star amala is married to south superstar nagarjun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.