SEE PICS: लग्नाआधीच गुडन्यूज देणा-या कल्कीने शेअर केला बेबी बम्पचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 11:48 AM2019-10-01T11:48:44+5:302019-10-01T11:49:09+5:30

होय, कल्की आई होणार आहे. ते सुद्धा लग्नाआधी.

kalki koechlin is enjoying pregnancy flaunts baby bump | SEE PICS: लग्नाआधीच गुडन्यूज देणा-या कल्कीने शेअर केला बेबी बम्पचा फोटो

SEE PICS: लग्नाआधीच गुडन्यूज देणा-या कल्कीने शेअर केला बेबी बम्पचा फोटो

googlenewsNext
ठळक मुद्दे 2009 मध्ये ‘देव डी’ या चित्रपटाच्या सेटवर कल्की  दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या प्रेमात पडली होती. यानंतर 2011 मध्ये दोघांनीही लग्न केले होते.

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपची एक्स-वाईफ कल्की कोच्लिन हिच्या घरी लवकरच नवा पाहुणा येणार आहे. होय, कल्की आई होणार आहे. ते सुद्धा लग्नाआधी.  घटस्फोटित कल्की सध्या एका इस्रायली पियानो वादकाला डेट करतेय. कल्की याच पियानो वादकाच्या बाळाची आई होणार आहे. नुकतीच कल्कीने आई बनणार असल्याची बातमी चाहत्यांशी शेअर केली होती. आता कल्कीने बेबी बम्प फ्लॉन्ट करतानाचा फोटो शेअर केला.


काऊचवर बसलेली कल्की आपल्या प्रेग्नंसीचे खास क्षण एन्जॉय करताना दिसतेय. 
 दीर्घकाळापासून कल्कीने कुठलाही नवा प्रोजेक्ट स्वीकारलेला नाही. याचे कारण म्हणजे, प्रेग्नंसी. होय, कल्की पाच महिन्यांची प्रेग्नंट आहे आणि याचमुळे तिने कुठलाही नवा प्रोजेक्ट स्वीकारलेला नाही. वॉटर बर्थद्वारे ती बाळाला जन्म देणार आहे. तिने स्वत: हा खुलासा केला. प्रेग्नंसीदरम्यान शरीरात आणि आयुष्यात होणारे बदल जाणवू लागले आहेत. मी स्वत:ची आधीपेक्षा अधिक काळजी घेतेय. माझ्या शारीरिक हालचालींमध्ये काहीसा संथपणा आला आहे. पण मी आनंदी आहे. मातृत्व ही एक आनंददायी भावना आहे, असे ती म्हणाली.


 सध्या कल्की इस्रायली पियानो वादक Guy Hershberg याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. कल्कीने काही दिवसांपूर्वी त्याच्यासोबतचा फोटो शेअर करत, हे नाते जगजाहिर केले होते. या फोटोत कल्की बॉयफ्रेन्डला किस करताना दिसली होती.   2009 मध्ये ‘देव डी’ या चित्रपटाच्या सेटवर कल्की  दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या प्रेमात पडली होती. यानंतर 2011 मध्ये दोघांनीही लग्न केले होते. पण हे नाते फार काळ टिकले नाही.

2015 मध्ये दोघांचाही घटस्फोट झाला. पण घटस्फोटानंतरही आजही कल्की व अनुराग कश्यप एकमेकांचे चांगले मित्र आहेत.  कल्कीला घटस्फोट दिल्यानंतर अनुराग शुभ्रा शेट्टी या त्याच्यापेक्षा 21 वर्षांनी लहान तरूणीच्या प्रेमात पडला. पण कल्की आत्तापर्यंत सिंगल होती.

मध्यंतरी ती आणि अभिनेता जिम सर्भ यांच्या अफेअरच्या अफवा उडाल्या होत्या. दोघेही लग्न करणार, असेही म्हटले गेले होते. पण या सगळ्या अफवा सिद्ध झाल्या. पण आता कल्की प्रेमात पडलीय. नुसतीच प्रेमात नाही तर आता ती आई देखील होणार आहे.

Web Title: kalki koechlin is enjoying pregnancy flaunts baby bump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.