‘कभी खुशी कभी गम’च्या शूटींगवेळी अशी झाली होती काजोलची अवस्था, वाचून डोळे पाणावतील

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2020 03:00 PM2020-02-09T15:00:00+5:302020-02-09T15:00:02+5:30

अलीकडे एका मुलाखतीत काजोलने स्वत: सोशल मीडियावर हा वेदनादायी किस्सा शेअर केला होता.

kajol talk about her miscarriage during kabhi khushi kabhie gham release |  ‘कभी खुशी कभी गम’च्या शूटींगवेळी अशी झाली होती काजोलची अवस्था, वाचून डोळे पाणावतील

 ‘कभी खुशी कभी गम’च्या शूटींगवेळी अशी झाली होती काजोलची अवस्था, वाचून डोळे पाणावतील

googlenewsNext
ठळक मुद्देकाजोलने मन ऑन बॉम्बे या इन्स्टाग्रामवरील प्रसिद्ध पेजला दिलेल्या मुलाखतीमध्ये ही गोष्ट सांगितली. आहे.

पडद्यावर वेगवेगळ्या भूमिका साकारणा-या कलाकारांच्या आयुष्यातही कसोटीचे अनेक क्षण येतात. ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान काजोलसोबत असेच काही घडले होते. आज आम्ही याचबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. अलीकडे एका मुलाखतीत काजोलने स्वत: सोशल मीडियावर हा वेदनादायी किस्सा शेअर केला होता. अजय देवगणसोबतची पहिली भेट ते लग्न शिवाय ‘कभी खुशी कभी गम’च्या शूटींगदरम्यानचा तो दु:खद प्रसंग याबद्दल ती बोलली होती.

तिने सांगितले की, मी आणि अजय २५ वर्षांपूर्वी ‘हलचल’ या चित्रपटाच्या सेटवर पहिल्यांदा भेटलो होतो. चित्रपटाच्या सेटवर मी तयार होऊन बसले होते. या चित्रपटातील माझा नायक कोण असे विचारले असता एका व्यक्तीने अजयकडे बोट दाखवले. तो एका कॉर्नरमध्ये बसला होता. त्याला प्रत्यक्ष भेटायच्या १० मिनिटे आधीपर्यंत मी त्याच्याबद्दल केवळ वाईट गोष्टीच बोलत होते.

 चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाल्यानंतर आम्ही दोघे एकमेकांचे खूपच चांगले मित्र बनलो. त्यावेळी आम्ही दोघेही दुस-या व्यक्तींच्या प्रेमात होतो. मी अजयकडे माझ्या बॉयफ्रेंडच्या तक्रारी करायचे. पण लवकरच माझे व माझ्या बॉयफ्रेन्डचे ब्रेकअप झाले आणि मी व अजय एकमेकांच्या जवळ आलोत. आम्ही दोघांनी एकमेकांना कधीच प्रपोज केले नाही. चार वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर आम्ही एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आमच्या लग्नाबाबत ऐकल्यावर अजयच्या घरातील सगळेच खूश झाले. पण माझे वडील ही गोष्ट कळल्यांतर माझ्याशी चार दिवस तरी बोलले नव्हते. मी लग्न न करता करियरवर लक्ष केंद्रित करावे असे त्यांना वाटत होते. पण मी माझा निर्णय घेतला होता.’

लग्नाबद्दल तिने सांगितले की, लग्न अतिशय साधेपणाने व्हावे असे आम्हाला वाटत असल्याने आम्ही मीडियाला लग्नाचे ठिकाण चुकीचे सांगितले होते. आम्ही घरीच लग्न केले आणि लग्नानंतर आम्ही सिडनी, हवाई, लॉस एन्जेलिस येथे हनिमूनला गेलो. पण तिथे अजय आजारी पडला. त्यामुळे पुढच्या ठिकाणांवर न जाता आम्ही घरी परतलो. 

‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटावेळी माझ्यासोबत असे काही घडले होते की मी ते आयुष्यभर विसरू शकत नाही, असे सांगत तिने एक वेदनादायी किस्सा शेअर केला. तिने सांगितले, ‘कभी खुशी कभी गम’च्या आधीच आमचे लग्न झाले होते. लग्नानंतर लगेच आम्हाला मुलं हवी होती, 2001 मध्ये ‘कभी खुशी कभी गम’चे शूटींग सुरु झाले तेव्हा मी प्रेग्नंट होते. परंतु ‘कभी खुशी कभी गम’ बॉक्स आॅफिसवर सुपरहिट झाला होता आणि मी रूग्णालयात होते. माझा गर्भपात झाला होता.

‘कभी खुशी कभी गम’ची टीम एकीकडे आनंद साजरा करत होती तर मी रूग्णालयात प्रचंड त्रासातून जात होते. मी त्यावेळी कोणत्या दु:खातून जात होते, हे माझे मलाच माहित. तो कठीण काळ होता. त्यानंतर पुन्हा एकदा माझा गर्भपात झाला. पण काही वषार्नंतर निसा आणि त्यानंतर युगचा जन्म झाला आणि आमचे सुखी कुटुंबाचे स्वप्न पूर्ण झाले. 

Web Title: kajol talk about her miscarriage during kabhi khushi kabhie gham release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.