आजारपणानंतर पहिल्यांदाच दिसल्या तनुजा, दुर्गापूजेला लावली काजोल आणि तनिषासोबत उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 06:37 PM2019-10-04T18:37:10+5:302019-10-04T18:38:33+5:30

तनुजा यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थिती लावली नव्हती. पण त्यांना नुकतेच दुर्गापूजेच्या निमित्ताने पाहाण्यात आले.

Kajol in Durga Puja festivities with mother Tanuja and sister Tanishaa Mukerji | आजारपणानंतर पहिल्यांदाच दिसल्या तनुजा, दुर्गापूजेला लावली काजोल आणि तनिषासोबत उपस्थिती

आजारपणानंतर पहिल्यांदाच दिसल्या तनुजा, दुर्गापूजेला लावली काजोल आणि तनिषासोबत उपस्थिती

googlenewsNext
ठळक मुद्देतनुजा यांनी अतिशय सुंदर कॉटनची साडी नेसली होती आणि काळ्या रंगाचा गॉगल घातला होता. त्या अतिशय फ्रेश दिसत होत्या. केवळ त्यांना चालायला त्रास होत असल्याने पाहायला मिळाले.

ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना डायव्हर्टिक्यूलीस नावाचा आजार झाला होता. त्यामुळे त्यांची सर्जरी करण्यात आली. डायव्हर्टिक्यूलीस हा आजार पोटाशी संबंधीत असतो. तनुजा यांना रुग्णालयात दाखल करण्याच्या आधी एक महिन्याअगोदर देखील त्यांची प्रकृती बिघडली होती आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. पण डायव्हर्टिक्यूलीसमुळे त्या पुन्हा अनेक दिवस रुग्णालयात दाखल होत्या. या ऑपरेशननंतर त्यांची प्रकृती ठणठणीत झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.

तनुजा यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थिती लावली नव्हती. पण त्यांना नुकतेच दुर्गापूजेच्या निमित्ताने पाहाण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या मुली काजोल आणि तनिषा दोघीदेखील उपस्थित होत्या. यावेळी तनुजा यांनी अतिशय सुंदर कॉटनची साडी नेसली होती आणि काळ्या रंगाचा गॉगल घातला होता. त्या अतिशय फ्रेश दिसत होत्या. केवळ त्यांना चालायला त्रास होत असल्याने पाहायला मिळाले. दुर्गापूजेला तनिषा पिंक रंगाच्या साडीत तर काजोल लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. काजोलने ड्रेसला साजेशे अशी ज्वेलरी घातली होती. त्या दोघीदेखील खूपच सुंदर दिसत होत्या.  

जुहू येथील दुर्गा पूजेला तनुजा, काजोल आणि तनिषा या तिघींनी हजेरी लावली होती. त्या तिघीही न चुकता दरवर्षी दुर्गापूजेला उपस्थिती लावतात. काजोलनेच तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर दूर्गापूजेचे हे फोटो पोस्ट केले असून हे फोटो तिच्या चाहत्यांना चांगलेच आवडले आहेत. तसेच काजोलचा एक वेगळाच अंदाज यावेळी प्रसारमाध्यमाच्या कॅमेऱ्यात कैद झाला. मंडपातून बाहेर पडताना ती प्रसारमाध्यमांच्या लोकांना तिची बॅग दाखवत होती आणि ही बॅग माझ्या बहिणीने स्वतः बनवली असल्याचे सगळ्यांना सांगत होती. तसेच तनिषाने मोबाईलमध्ये काढलेल्या फोटोंमधील काही फोटो तिला हवे असल्याचे ती तनिषाला सांगत असल्याचे या व्हिडिओत आपल्याला दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 
 

Web Title: Kajol in Durga Puja festivities with mother Tanuja and sister Tanishaa Mukerji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Kajolकाजोल