हौसेला मोल नसतं ! ज्युनिअर एनटीआरची 3.16 कोटींची गाडी अन् इतक्या लाखांची नंबरप्लेट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 04:42 PM2021-09-24T16:42:50+5:302021-09-24T16:46:30+5:30

Jr NTR : पठ्ठ्याकडे अनेक महागड्या व अलिशान गाड्या आहेत. आता त्यानं महागडी लम्बोर्गिगनी उरूस ग्रेफाइट कॅप्सूल ही लक्झरी नवीकोरी कार खरेदी केली आहे.

Jr Ntr Spends Rs 17 Lakhs To Get A Fancy Number For His Lamborghini | हौसेला मोल नसतं ! ज्युनिअर एनटीआरची 3.16 कोटींची गाडी अन् इतक्या लाखांची नंबरप्लेट

हौसेला मोल नसतं ! ज्युनिअर एनटीआरची 3.16 कोटींची गाडी अन् इतक्या लाखांची नंबरप्लेट

Next
ठळक मुद्देज्युनिअर एनटीआर गाड्यांचा शौकीन आहे.  पोर्श 718 केमॅन ही जवळपास दीड कोटी रुपयांची कार त्याच्या ताफ्यात आहे.

हौसेला मोल नसतं, असं म्हणतात ते उगाच नाही. महागड्या अलिशान गाड्यांचा शौक त्यावर या गाड्यांसाठी फॅन्सी नंबर मिळवण्याची ऐश करणारे तुम्ही अनेकदा बघितले असतील. आता साऊथचा सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरचेच  (Jr NTR) उदाहरण घ्या. पठ्ठ्याकडे  अनेक महागड्या व अलिशान गाड्या आहेत. आता त्यानं महागडी लम्बोर्गिगनी उरूस ग्रेफाइट कॅप्सूल ( Lamborghini Urus Graphite Capsule) ही लक्झरी नवीकोरी कार खरेदी केली आहे. ही गाडी  कार खरेदी करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. 

ज्युनिअर एनटीआरने खरेदी केलेल्या लम्बोर्गिनी उरुस ग्रेफाइट कॅप्सूलची किंमत 3.16 कोटी आहे. त्याची ही ब्लॅक कलरची कार केवळ 3.6 सेकंदात  0 ते 100 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने धावू शकते. टॉप स्पीडचे म्हणाल तर या गाडीची टॉप स्पीड 305 किमी प्रतितास आहे आणि ही जगातील सर्वात फास्ट एसयुव्ही आहे. आता इतकी खास गाडी म्हटल्यावर त्याची नंबरप्लेटही खास हवी.
तेव्हा या कारच्या स्पेशल नंबर प्लेटसाठी ज्युनिअर एनटीआरने किती रूपये मोजलेत माहितीये? तर तब्बल 17 लाख. होय, 17 लाख रूपये मोजून त्याने आपल्या कारसाठी 9999 हा खास नंबर निवडला आहे. त्याच्या या लक्झरी कारचा नंबर टीएस09 एफएस 9999 असा आहे.

खेरताबाद आरटीओ ऑफिसमध्ये आयोजित एका समारंभात जुनियर एनटीआरने या फॅन्सी नंबरसाठी बोली लावली.  एनटीआरकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. यातील बीएमडब्ल्यू 720 एलडी या गाडीचा नंबरदेखील 9999 असाच आहे. त्यामुळे एनटीआरसाठी हा नंबर लकी आहे, हे नव्याने सांगणे नकोच.
ज्युनिअर एनटीआर गाड्यांचा शौकीन आहे.  पोर्श 718 केमॅन ही जवळपास दीड कोटी रुपयांची कार त्याच्या ताफ्यात आहे. याशिवाय रेंज रोव्हर व्होग, मर्सिडीज-बेंझ जीएलएस 350 आणि बीएमडब्ल्यू 720 एलडी या महागड्या गाड्या त्याच्याकडे आहेत.

Web Title: Jr Ntr Spends Rs 17 Lakhs To Get A Fancy Number For His Lamborghini

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app