ठळक मुद्देया दृश्यात जॉनीच्या मुलाच्या भूमिकेत असलेला बालकलाकार जॉनीचा मुलगा जेस्सी लिव्हर होता. त्याने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या हृतिकच्या वॉर या चित्रपटात मुथ्थू ही भूमिका साकारली होती.

जॉनी लिव्हरला बॉलिवूडमधील महान कॉमिक अभिनेत्यांपैकी एक मानले जाते. त्याने गेल्या अनेक वर्षांत मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. जॉनी लिव्हरला आजवर त्याच्या अभिनयासाठी अनेक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे. जॉनीच्या पावलावर पाऊल ठेवून त्याचा मुलगा जेस्सी देखील या क्षेत्रात आपले भाग्य आजमावत आहे. 

जेस्सीने नुकतेच वॉर या चित्रपटात काम केले होते. पण तुम्हाला माहीत आहे का, त्याआधी त्याने कभी खुशी कभी गम या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारली होती. कभी खुशी कभी गम या चित्रपटाला आज अनेक वर्षं झाली असली तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाही. या चित्रपटात काजोल, शाहरुख खान, जया बच्चन, हृतिक रोशन, करिना कपूर आणि अमिताभ बच्चन महत्त्वाच्या भूमिकेत होते. या चित्रपटात जॉनी लिव्हरला देखील एका खास भूमिकेत पाहायला मिळाले होते. हृतिक आपल्या भावाचा म्हणजेच शाहरुख खानचा शोध घेत घसिटाराम म्हणजे जॉनी लिव्हरकडे पोहोचतो. शाहरुख कुठे राहातो याची घसिटारामला कल्पना असेल याची त्याला खात्री असते. शाहरुख सध्या कुठे आहे हे हृतिक जॉनीला विचारतोय हा या चित्रपटातील सीन मस्त जमून आला होता. या सीनमधील जॉनीच्या कॉमिक टायमिंगचे प्रचंड कौतुक झाले होते. पण या दृश्यात जॉनीसोबतच जॉनीच्या मुलाच्या भूमिकेत असलेल्या बालकलाकाराने देखील सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

या दृश्यात जॉनीच्या मुलाच्या भूमिकेत असलेला हा बालकलाकार कोण होता हे तुम्हाला माहितेय का? हा बालकलाकार दुसरा कोणीही नसून जॉनीचा मुलगा जेस्सी लिव्हर होता. त्याने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या हृतिकच्या वॉर या चित्रपटात मुथ्थू ही भूमिका साकारली होती. तसेच बोमन इराणीसोबत तो एका जाहिरातीत देखील झळकला होता. ये साली आशिकीमध्ये देखील तो साहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत दिसला होता. जेस्सी अभिनयासोबतच त्याच्या फिटनेसच्या बाबतीत सतर्क असून तो व्यायाम करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. 

Web Title: Johny lever’s real son Ghasitaram from Kabhi Khushi Kabhie Gham is all grown up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.