johny lever daughter jamie lever makes mimicry of kangana ranau kareena kapoor farah khan sonam kapoor | तुफान व्हायरल होतोय जॉनी लिव्हरच्या लेकीचा हा व्हिडीओ, कंगना ते सोनम अनेकींची केली नक्कल

तुफान व्हायरल होतोय जॉनी लिव्हरच्या लेकीचा हा व्हिडीओ, कंगना ते सोनम अनेकींची केली नक्कल

ठळक मुद्देजैमी आपल्या यूट्यूब चॅनलवर कायम सक्रिय असते. तिचे व्हिडीओ खूप व्हायरलही होतात.  

कुणी निंदा कुणी वंदा हसवणं हाच आमचा धंदा... म्हणत कॉमेडीचा बादशाह जॉनी लिव्हर आजही  तमाम रसिकांचे मनोरंजन करत असतो.  भन्नाट टायमिंग आणि कसदार अभिनयाच्या जोरावर जॉनी लिव्हरने बॉलिवूडमध्ये आपले एक  वेगळे स्थान निर्माण केले आहे. करियरमध्ये कितीही चढउतार आले तरी तो डगमगला नाही.  अवघं जगं जिंकून घेतल्याप्रमाणे तो आजही सा-यांच्या मनजावर राज्य करतोय. जेव्हा जेव्हा कॉमेडीचा विषय निघतो तेव्हा डोळ्यासमोर सर्वात आधी फक्त आणि फक्त जॉनी लिव्हरचा चेहरा डोळ्यासमोर येतो. स्टँडअप कॉमेडीला खरी ओळख जॉनी लिव्हरनेच मिळवून दिली आहे. आता जॉनी लिव्हरची लेक जैमी लिव्हरही  वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून कॉमेडीच्या मैदानात उतरली आहे. जैमीने एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओत ती कंगना पासून सोनम कपूरपर्यंत अनेकींची मिमिक्री करताना दिसतेय.

करिना कपूर, कंगना राणौत, सोनम कपूर, आशा भोसले, फराह खान आदींची नक्कल करताना ती या व्हिडीओत दिसतेय. जैमीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. आत्तापर्यंत या व्हिडीओला सुमारे 5 लाखांवर व्ह्युज मिळाले आहेत.

जैमी अद्याप मोठ्या पडद्यावर दिसलेली नाही. पण  छोट्या पडद्यावर तिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या जैमी विविध टीव्ही शोमध्ये पाहायला मिळते. याशिवाय तिचे एक यूट्यूब चॅनलही आहे.सा चॅनलचे सुमारे 2 लाख सबस्क्रायबर आहेत. सर्वच ठिकाणी लोक तिला खूप पसंत करतात. याशिवाय सोशल मीडियावरही तिच्या चाहत्यांची काही कमी नाही.  
जैमी आपल्या यूट्यूब चॅनलवर कायम सक्रिय असते. तिचे व्हिडीओ खूप व्हायरलही होतात.  

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: johny lever daughter jamie lever makes mimicry of kangana ranau kareena kapoor farah khan sonam kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.