Jaya Bachchan gets angry at photographers for clicking pics at Manish Malhotra's father's prayer meet | तुम लोगों को बिल्कुल तमीज नहीं है न! जया बच्चन पुन्हा भडकल्या!!

तुम लोगों को बिल्कुल तमीज नहीं है न! जया बच्चन पुन्हा भडकल्या!!

ठळक मुद्देजया बच्चन claustrophobic या आजाराने पीडित आहे. ही एक प्रकारची मानसिक स्थिती आहे.

जया बच्चन पुन्हा भडकल्या. होय, मीडियाच्या फोटोग्राफर्सला जया यांनी पुन्हा एकदा सुनावले. गत 18 नोव्हेंबरला फॅशन डिझाईनर मनीष मल्होत्राच्या वडिलांचे निधन झाले. काल मंगळवारी मनीषच्या घरी प्रेअर मीट होती. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी यावेळी हजर होते. जया बच्चन या सुद्धा मुलगी श्वेता बच्चन हिच्यासोबत या प्रेअरमीटसाठी पोहोचल्या.
 मनीष मल्होत्राच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर जया बच्चन व श्वेता बच्चन घरी जाण्यासाठी निघाल्या. मनीष मल्होत्राच्या अपार्टमेंटमधून बाहेर पडत असताना समोर फोटोग्राफर्सला पाहून जया यांचा पारा चढला. ‘तुम लोगों को बिल्कुल तमीज नहीं है न,’ अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

‘प्रसंग कोणता आहे, हेही तुम्हाला कळू नये. अशा प्रसंगी तुमच्या घरासमोर अशीच गर्दी करून कुणी उभे झाले तर तुम्हाला कसे वाटेल, हेच मला पहायचेय,’ असे म्हणत रागारागात जया आपल्या कारमध्ये बसल्या. श्वेताने जया यांना कारमध्ये बसवले व स्वत: वेगळ्या कारने निघाली.

जया बच्चन त्यांच्या रागासाठी ओळखल्या जातात. पापाराझींनी फोटोंसाठी पिच्छा पुरवणे तर दूर, एखादा फोटो काढला तरी जया बच्चन यांचा पारा चढतो. आत्तापर्यंत अनेकदा जया बच्चन मीडिया फोटोग्राफ व चाहत्यांवर बरसल्या आहेत. जया बच्चन यांना इतका राग का येतो, हे आत्तापर्यंत अनेकांना पडलेले कोडे होते. पण अलीकडे जया यांचा मुलगा अभिषेक बच्चन आणि मुलगी श्वेता बच्चन यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले होते.
जया बच्चन claustrophobic या आजाराने पीडित आहे. ही एक प्रकारची मानसिक स्थिती आहे. या आजाराने पीडित व्यक्ती अचानक गर्दी पाहून बेचैन होते. अनेकदा तिला राग येतो. गर्दीच्या ठिकाणी हे लोक अस्वस्थ होतात.  
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Jaya Bachchan gets angry at photographers for clicking pics at Manish Malhotra's father's prayer meet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.