ठळक मुद्देदुस-याच दिवशी रेखा व जयाच्या डिनरच्या बातम्या मीडियात उमटल्या. 

आज जया बच्चन यांचा वाढदिवस. आज जया  बॉलिवूडमध्ये अ‍ॅक्टिव्ह नाहीत. पण एकेकाळी त्यांच्या अभिनयावर लोक फिदा होते. 1971 साली जयांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली आणि 1973 साली अमिताभ बच्चन यांच्यासोबत लग्न. पण या लग्नानंतर काहीच वर्षांत रेखा आणि अमिताभ यांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या आणि बघता बघता जया यांनाही या नात्याची भणक लागली.

1976 मध्ये फिल्म ‘दो अनजाने’च्या सेटवर अमिताभ आणि रेखा एकमेकांच्या प्रेमात पडले होते, असे म्हटले जाते. थोड्याच दिवसात या प्रेमाचे किस्से बी-टाऊनमध्ये चवीने चघळले जाऊ लागले. अमिताभ व रेखाच्या लव्ह अफेअरच्या हेडलाईन बनू लागल्या. जयापर्यंत या बातम्या पोहोचायला वेळ लागला नाही. मग काय, याचदरम्यान असे काही झाले की, सर्वकाही बदलले.

होय, बाहेर अमिताभ-रेखाच्या प्रेमाच्या जोरदार चर्चा सुरु असताना जया यांनी रेखाला डिनरसाठी घरी बोलवले. ते सुद्धा अमिताभ शूटींगसाठी मुंबईबाहेर असताना. जया यांनी रेखांना फोन केला. फोनवर जया आपल्याला बरेवाईट बोलतील, असे रेखांना वाटले होते. पण असे काहीच झाले नाही. जया यांनी अतिशय प्रेमाने रेखा यांना डिनसाठी निमंत्रित केले. पण रेखा घाबरल्या. जया घरी बोलवून आपला अपमान तर करणार नाहीत ना, ही भीती त्यांना होती. पण निमंत्रण स्वीकारण्याशिवाय दुसरा इलाज नव्हता. रेखांनी डिनरसाठी होकार दिला.

घाबरत घाबरत रेखा जया यांच्या घरी डिनरसाठी पोहोचल्या. अमिताभ नव्हतेच. जया यांनी रेखांचे स्वागत केले. दोघीही डिनरला बसल्या. यादरम्यान दोघींतही खूप गप्पा झाल्या. आश्चर्य म्हणजे, या गप्पांमध्ये कुठेही अमिताभ यांचा उल्लेख नव्हता. डिनर झाल्यानंतर जया यांनी रेखाला घर दाखवले. सगळे काही आटोपल्यावर रेखांनी जयांचा निरोप घेतला आणि त्या घरी जाण्यासाठी निघाल्या़तेव्हा जया त्यांना बाहेर सोडण्यासाठी गेल्या. हाच तो क्षण होता ज्या क्षणाला सर्वकाही बदलले. होय, इतका वेळ गप्पा मारताना जया रेखा यांना  अमिताभ यांच्याबद्दल एक शब्दही बोलल्या नाहीत. पण दरवाज्यावर रेखांना निरोप देताना त्या असे एक वाक्य बोलल्या की, त्या वाक्याने सगळे काही बदलले. होय, ‘चाहे कुछ भी हो जाए पर मैं अमित को नहीं छोडूंगी...,’ हे ते वाक्य. जया यांचे ते वाक्य ऐकून रेखा सुन्न झाल्यात.

दुस-याच दिवशी रेखा व जयाच्या डिनरच्या बातम्या मीडियात उमटल्या. अमिताभ यांना याबद्दल कळले आणि त्यादिवसानंतर अमिताभ व रेखा कायमचे दुरावले. रेखांसोबतचे सगळे मोहपाश तोडत अमिताभ जयांकडे परतले ते कायमचे.
 

Web Title: jaya bachchan birthday she call rekha for dinner interesting facts-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.