javed akhtar saved due to travelling in another car shabana azmi is out of danger | शबाना आझमी यांची प्रकृती धोक्याबाहेर, म्हणून बचावले जावेद अख्तर...!!

शबाना आझमी यांची प्रकृती धोक्याबाहेर, म्हणून बचावले जावेद अख्तर...!!

ठळक मुद्देएक्स्प्रेस वेवर एका ट्रकला मागून शबाना आझमी यांची कार धडकली आणि हा अपघात घडला.

ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी शनिवारी दुपारी कार अपघातात जखमी झाल्या. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ हा अपघात घडला. या अपघातात त्यांच्या कारचा चालक आणि त्या जखमी झाल्या असून दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. या अपघाताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि सगळ्यांनाच धक्का बसला. शबाना आझमींचे पती जावेद अख्तर याच गाडीतून प्रवास करत होते, मात्र त्यांना या अपघातात साधे खरचटलेही नाही, असे सांगण्यात आले. पण सत्य मात्र काही वेगळेच आहे. होय, प्रत्यक्षात जावेद अख्तर अपघातग्रस्त कारमध्ये नव्हतेच. ते दुस-या कारमधून प्रवास करत होते. त्यामुळे ते अपघातातून बचावले.

जावेद अख्तर यांची कार शबानांच्या कारच्या मागे होती. दोघेही एकाच गाडीत नव्हते. हेच कारण आहे की, जावेद अख्तर या अपघातातून बचावले. या अपघातात शबाना यांच्या नाकाला आणि डोक्याला दुखापत झाली आहे. आधी त्यांना मुंबईच्या एमजीएम रूग्णालयात भरती करण्यात आले होते. यानंतर रात्री उशीरा त्यांना कोकिळाबेन धीरूबाई अंबानी रूग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत असून त्यांची प्रकृती स्थिर व धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येतेय.
एक्स्प्रेस वेवर एका ट्रकला मागून शबाना आझमी यांची कार धडकली आणि हा अपघात घडला. दरम्यान या प्रकरणात ट्रकचा ड्रायव्हरने शबानाच्या ड्रायव्हरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शबाना यांचा ड्रायव्हर अमलेश कामत अतिवेगाने गाडी चालवत होता. त्याने ट्रकला धडक दिली. त्याच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप ट्रक ड्रायव्हरने केला आहे.

Web Title: javed akhtar saved due to travelling in another car shabana azmi is out of danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.