बाबो! जॅकलीन आधी ज्याला ओळखण्यास देत होती नकार, त्या महाठगासोबतचा रोमॅंटिक फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 01:27 PM2021-11-27T13:27:06+5:302021-11-27T13:29:14+5:30

Jacqueline Fernandez : सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्या (Jacqueline Fernandez) अडचणी वाढू शकतात.

Jacqueline Fernandez romantic photo gone viral with Sukesh Chandrashekhar | बाबो! जॅकलीन आधी ज्याला ओळखण्यास देत होती नकार, त्या महाठगासोबतचा रोमॅंटिक फोटो व्हायरल

बाबो! जॅकलीन आधी ज्याला ओळखण्यास देत होती नकार, त्या महाठगासोबतचा रोमॅंटिक फोटो व्हायरल

Next

जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) एक अशी अभिनेत्री आहे जी नेहमीच आनंदी दिसते. पण लवकरच तिच्या अडचणी वाढणार  आहेत आणि तिच्या चेहऱ्यावरील हसू गायब होणार आहे. कारण तिचा एक फोटो व्हायरल झाला असून त्यात तिला एक व्यक्ती किस करताना दिसत आहे. तिला किस करणारी व्यक्ती सामान्य व्यक्ती नाही तर एक महाठग आहे.

सुकेशच्या जवळ आहे जॅकलीन

सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्या (Jacqueline Fernandez) अडचणी वाढू शकतात. या केसमध्ये सुरूवातीपासून  जॅकलीनचं नाव समोर येत होतं आणि ईडीने अनेकदा जॅकलीनला चौकशीसाठी बोलवलं होतं. जेव्हाही जॅकलीनला सुकेशबाबत विचारलं जात होतं, तेव्हा ती हेच सांगत होती की, ती सुकेशला ओळखत नाही. आता याप्रकरणात नवं वळण आलं आहे. या केसचा मुख्य आरोपी सुकेशसोबतचा जॅकलीनचा एक फोटो व्हायरल झाला आहे. ज्यात दोघेही फार जवळ असल्याचं दिसत आहेत.

रोमॅंटिक पोज

हा फोटो ईडीच्या हाती लागला आणि  त्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाली. फोटोत जॅकलीन आणि मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखर आरशासमोर रोमॅंटिक पोजमध्ये दिसत आहेत. दावा केला जात आहे की, हा फोटो तेव्हाचा आहे जेव्हा सुकेश तिहार तुरूंगातून जामीनावर बाहेर आला होता. तो बाहेर आल्यावर लगेच चेन्नईला गेला होता. हा फोटो चेन्नईतील एका फाइव्ह स्टार हॉटेलमधील असल्याचं सांगितलं जात आहे. 

काय आहे सुकेशवर आरोप

सुकेशने जॅकलीन (Jacqueline Fernandez) सोबत मैत्री करताना स्वत:ला एक मोठा बिझनेसमन असल्याचं सांगितलं होतं. सुकेशवर २०० कोटी रूपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. सुकेशने जॅकलीनला महागडे गिफ्ट दिले होते आणि याच कारणने ईडीने जॅकलीनला चौकशीसाठी बोलवलं होतं. सुकेशवर रॅनबॅक्सीच्या प्रमोटरला तुरूंगातून बाहेर काढण्यासाठी त्याच्या पत्नीची २०० कोटी रूपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी अभिनेत्री नोरा फतेही हिचीही चौकशी झाली होती.
 

Web Title: Jacqueline Fernandez romantic photo gone viral with Sukesh Chandrashekhar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app