jackie shroff opens up on tiger shroff disha patani relationship says he has found a girlfriend after 25 years |  जॅकी श्रॉफ म्हणतात, २५ वर्षांनंतर टायगरला कुणी भेटली, चालू द्या...!
 जॅकी श्रॉफ म्हणतात, २५ वर्षांनंतर टायगरला कुणी भेटली, चालू द्या...!

ठळक मुद्दे‘कॉफी विद करण 6’मध्ये टायगरला दिशाबद्दल विचारले असता, ती माझी खूप चांगली मैत्रिण असल्याचे त्याने सांगितले होते.

टायगर श्रॉफ व दिशा पाटनी एकमेकांना डेट करत आहेत, हे कुणापासूनही लपून राहिलेले नाही. त्यामुळे टायगर व दिशाची बातमी म्हटली की, यात काय नवे? असे तुम्ही म्हणाल. पण नवे आहे. काय, तर टायगरचे पापा जॅकी श्रॉफ यांची प्रतिक्रिया. होय, अलीकडे बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत जॅकी श्रॉफ टायगर व दिशाच्या रिलेशनशिपबद्दल बोलले. 
दिशा व टायगरबद्दल मीडियात काय चर्चा आहेत, याकडे मी लक्ष देत नाही. मी केवळ ‘ढील’ देतो. टायगरने आयुष्याची २५ वर्षे गर्लफ्रेन्डशिवाय घालवली आहेत. २५ वर्षांनंतर त्याला कुणी एक मिळाली आहे तर चालू द्या. त्याला त्याची गर्लफ्रेन्ड आवडते आणि त्याच्या या आनंदातच माझा आनंद आहे. मी कायम त्याला समाजाच्या चौकटीत राहण्याची शिकवण  दिली आहे  त्यामुळे तो कधीच मर्यादा लांघणार नाही, हेही मला ठाऊक आहे, असे जॅकी यावेळी म्हणाले. टायगरच्या गर्लफ्रेन्डचा उल्लेख करताना जॅकी यांनी दिशाचे नाव घेणे टाळले. पण ‘इशारों इशारों में’ ते बरेच काही बोलून गेलेत.

त्या दोघांचेही समान छंद आहेत. दोघांनीही डान्स, वर्कआऊट आवडते. आता भविष्यात ते लग्न करतात की आयुष्यभर मित्र बनून राहतात, ते कुणाला ठाऊक? सध्या तरी ते चांगले मित्र आहेत, असेही जॅकी म्हणाले.


यापूर्वी टायगर श्रॉफ दिशाबद्दल बोलला होता. ‘कॉफी विद करण 6’मध्ये टायगरला दिशाबद्दल विचारले असता, ती माझी खूप चांगली मैत्रिण असल्याचे त्याने सांगितले होते. मला तिच्यासोबत वेळ घालवणे आवडते. आमच्या आवडीनिवडी समान आहेत. इंडस्ट्रीत माझे फार मित्र नाहीत. ती एकमेव अशी आहे, जिच्यासोबत मी प्रचंड कंफर्टेबल असतो, असेही तो म्हणाला होता. 

Web Title: jackie shroff opens up on tiger shroff disha patani relationship says he has found a girlfriend after 25 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.