Jab We Met Actor Tarun Arora To Lock Horns With Akshay Kumar In Laxmmi Bomb | अक्षय कुमारच्या 'लक्ष्मी बॉम्ब'मध्ये हा अभिनेता साकारणार खलनायक

अक्षय कुमारच्या 'लक्ष्मी बॉम्ब'मध्ये हा अभिनेता साकारणार खलनायक

बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार आगामी चित्रपट 'लक्ष्मी बॉम्ब'मुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत अभिनेत्री कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट तमीळ कॉमेडी हॉरर सिनेमा 'कंचना'चा रिमेक आहे. या चित्रपटात आता आणखीन एका अभिनेत्याची वर्णी लागली आहे. हा अभिनेता म्हणजे 'जब वी मेट'मध्ये झळकलेला अभिनेता तरूण अरोरा. या चित्रपटाचे दिग्दर्शन दाक्षिणात्य दिग्दर्शक राघव लॉरेन्स यांनी केले आहे. या चित्रपटाचे शूटिंग एप्रिल महिन्यातच सुरु झाले आहे. 

'लक्ष्मी बॉम्ब' चित्रपटातील अक्षय कुमारचा लूक पाहिल्यानंतर त्याचे चाहते या चित्रपटाबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत. अक्षय कुमार नेहमी वेगवेगळ्या भूमिकेत रसिकांना पहायला मिळतो. या चित्रपटातून पुन्हा एकदा त्याचा वेगळा अंदाज प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, लक्ष्मी बॉम्ब चित्रपटात व्हिलनच्या भूमिकेत अभिनेता तरुण अरोरा दिसणार आहे. तरुणने २००७ साली प्रदर्शित झालेल्या जब वी मेट या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात त्याने करीनाच्या बॉयफ्रेंडची भूमिका साकारली होती. या भूमिकेचे नाव अंशुमन होते. याव्यतिरिक्त अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही त्याने काम केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, रिमेकप्रमाणे या चित्रपटातही एका भ्रष्ट आमदाराच्या रुपात खलनायक असणार आहे. यावर्षी एप्रिलमध्ये प्रदर्शित झालेल्या 'कंचना ३' मध्ये तरुणने दिग्दर्शक राघव यांच्यासोबत काम केले होते.

 'लक्ष्मी बॉम्ब' या चित्रपटात एका ट्रान्सजेंडर भूताने अक्षयच्या शरीराचा ताबा मिळवलेला असतो. हा सिनेमा ५ जून २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: Jab We Met Actor Tarun Arora To Lock Horns With Akshay Kumar In Laxmmi Bomb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.