It will be an absolute honour to play Kalpana Chawla on screen ! says Vaani Kapoor | वाणी कपूरला रुपेरी पडद्यावर साकारायचीय कल्पना चावला

वाणी कपूरला रुपेरी पडद्यावर साकारायचीय कल्पना चावला

बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर हिने आपल्या अभिनय कौशल्याने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले. तिने तिचे चित्रपट आणि भूमिकांची निवड आश्चर्यकारक पद्धतीने करत इंडस्ट्रीत प्रवेश केला आहे. तिने दाखवून दिले आहे की ती ज्या चित्रपटासाठी परफेक्ट आहे त्याचाच भाग होऊ इच्छिते आणि अशा चित्रपटांची निवड करण्यासाठी ती प्रतीक्षाही करण्यास तयार आहे. 

वाणी कपूरने आजपर्यंत रणबीर कपूर, रणवीर सिंग आणि हृतिक रोशन या बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे आणि आता ती अक्षय कुमारसोबत काम करण्यास सज्ज आहे.

रणबीर कपूरसोबत शमशेरा आणि अक्षय कुमारसोबत बेलबॉटम या मोठ्या चित्रपटात ती झळकणार आहे. याबाबत ती म्हणते की, ‘मला बायोपिक करायला आवडेल! ‘कल्पना चावला ह्या जगभरातील स्त्रियांसाठी आणि ज्यांना कधीही अंतराळवीर होण्याचे स्वप्न पडले आहे अशा सर्वांसाठी एक आदर्श रोल मॉडेल आहेत. त्या एक प्रेरणास्थान आहेत आणि त्यांची कथा नक्कीच सर्वांपर्यंत पोहचवली जाईल. मला खरोखरच त्यांना ऑन-स्क्रीन प्ले करायचे आहे, याचा मला सन्मान वाटेल.

एकेकाळी प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादुकोण या बायोपिकसाठी घेण्याचा विचार आहे, अशी चर्चा असताना या प्रोजेक्टसाठी वाणी कपूर तिचा हेतू स्पष्ट करीत असल्याचे दिसते. कलाकार म्हणून जोखीम घेण्यास आणि हा बायोपिक करण्याच्या प्रयत्नात त्यांना मदत करायला आवडेल आणि त्यांच्या करियरच्या कालावधीतील अनेक शैलींचा प्रयोगही करायला आवडेल असे वाणीला वाटते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: It will be an absolute honour to play Kalpana Chawla on screen ! says Vaani Kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.