Irrfan Khan's wife Sutapa became emotional and said- I will meet you TJL | इरफान खानच्या आठवणीत भावूक झाली पत्नी सुतापा, म्हणाली- मी तुला भेटेन

इरफान खानच्या आठवणीत भावूक झाली पत्नी सुतापा, म्हणाली- मी तुला भेटेन

बॉलिवूड अभिनेता इरफान खानने जगाचा निरोप घेतला आहे. त्याच्या निधनाला एक महिना झाला आहे. इरफानने 29 एप्रिलला अखेरचा श्वास घेतला. त्याच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये सगळ्यांनाच धक्का बसला होता. त्याच्या निधनाला एक महिना उलटला आहे. पण त्याचं कुटुंब अद्याप या धक्क्यातून सावरलेले नाही. आता त्याच्या निधनाला एक महिना पूर्ण झाल्यावर त्याची पती सुतापा सिकदरने पुन्हा एकदा एक इमोशनल पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केली आहे.

इरफानची पत्नी सुतापा त्याच्या अखेरच्या काळापर्यंत त्याच्यासोबत होती. पण इरफानने 29 एप्रिलला जगाचा निरोप घेतला. त्याला जाऊन एक महिना पूर्ण झाल्यावर त्याची पत्नी सुतापानं मात्र त्याच्यासाठी एक इमोशनल पोस्ट लिहिली आहे. जी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. सुतापाने इरफानचे काही अनसीन फोटो फेसबुकवर शेअर केले आहेत. ज्याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, इथून खूप दूर प्रत्येक चूक किंवा बरोबरच्या पलिकडे एक रिकामे मैदान आहे. तिथे मी तुला भेटेन. जेव्हा आपला आत्मा त्या हिरवळीवर शांतपणे झोपलेला असेल आणि हे जग बोलून थकलेले असेल. बस काही दिवसांचा तर प्रश्न आहे. मग आपण भेटू, गप्पा मारू.


सुतापाने जे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यात हे दोघेही कोणत्यातरी पार्कमध्ये आहेत. ज्यातील एका फोटोमध्ये इरफान एकटाच हिरवळीवर झोपलेला आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये त्याने सुतापासोबत सेल्फी घेतली आहे.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Irrfan Khan's wife Sutapa became emotional and said- I will meet you TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.