करण जोहरच्या कथित ड्रग्ज पार्टी प्रकरणाची चौकशी सुरू, मुंबई एनसीबीकडे तक्रार वर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 02:05 AM2020-09-19T02:05:51+5:302020-09-19T06:16:17+5:30

सिरसा यांनी मंगळवारी एनसीबीचे प्रमुख राकेश अस्थाना यांची भेट घेतली होती. यावेळी करण जोहर आणि इतर कलाकारांवर ३० जुलै, २०१९ मध्ये एका ड्रग्स पार्टीचे आयोजन केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली.

Investigation into Karan Johar's alleged drug party case underway, complaint class to Mumbai NCB | करण जोहरच्या कथित ड्रग्ज पार्टी प्रकरणाची चौकशी सुरू, मुंबई एनसीबीकडे तक्रार वर्ग

करण जोहरच्या कथित ड्रग्ज पार्टी प्रकरणाची चौकशी सुरू, मुंबई एनसीबीकडे तक्रार वर्ग

googlenewsNext

मुंबई : दिग्दर्शक, निर्माता करण जोहर यांच्या कथित ड्रग्ज पार्टी प्रकरणी शिरोमणी अकाली दलाचे आमदार मनजिंदरसिंग सिरसा यांनी दिल्ली एनसीबीकडे तक्रार केली होती. ती शुक्रवारी पुढील चौकशीसाठी मुंबई एनसीबीकडे वर्ग करण्यात आली. याबाबत अधिक चौकशी करण्यात येत असून, यात अनेक बड्या सेलिब्रिटींची नावे आहेत.
सिरसा यांनी मंगळवारी एनसीबीचे प्रमुख राकेश अस्थाना यांची भेट घेतली होती. यावेळी करण जोहर आणि इतर कलाकारांवर ३० जुलै, २०१९ मध्ये एका ड्रग्स पार्टीचे आयोजन केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, करण जोहर, अभिनेत्री दीपिका पादुकोण, मलायका अरोरा, अभिनेता अर्जुन कपूर, शाहिद कपूर, वरुण धवन, विक्की कौशल, इतरांविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत तक्रार नोंदवण्यात आली. त्यानंतर, आता ती पुढील तपासासाठी मुंबई एनसीबीकडे पाठविली आहे. गरज पडल्यास या कलाकारांना चौकशीस बोलाविण्यात येऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, यापूर्वी करणसह विक्की कौशलने आरोप फेटाळून लावले आहेत.

कॉफी विथ एनसीबी - सिरसा
आमदार सिरसा यांनी करण जोहर यांचा प्रसिद्ध कार्यक्रम ‘कॉफी विथ करण’चा आधार घेत, तो लवकरच ‘कॉफी विथ एनसीबी’ होईल, जेथे करणची अनेक गूढ रहस्ये उघडकीस येतील, असे टिष्ट्वट गुरुवारी केले. हे टिष्ट्वट त्यांनी काही बॉलीवूड स्टार्सना टॅगही केले आहे.

मुंबई पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप
सिरसा यांच्या आरोपानुसार, या पार्टीबाबत मुंबई पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र, त्यांनी दुर्लक्ष केले. वेळीच लक्ष दिले असते, तर बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शनला ब्रेक बसला असता, किमान आता तरी याची योग्य चौकशी होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Investigation into Karan Johar's alleged drug party case underway, complaint class to Mumbai NCB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.