घाईघाईत उरकले होते अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचे लग्न, वाचा त्या 24 तासात नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 03:02 PM2020-05-29T15:02:45+5:302020-05-29T15:16:01+5:30

अमिताभ वडिलांचे शब्द टाळू शकत नव्हते.

Interesting facts about amitabh Bachchan and jaya bachchan's wedding gda | घाईघाईत उरकले होते अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचे लग्न, वाचा त्या 24 तासात नेमकं काय घडलं?

घाईघाईत उरकले होते अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचे लग्न, वाचा त्या 24 तासात नेमकं काय घडलं?

googlenewsNext

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन बॉलिवूडमधले एक आदर्श जोडपे आहे. या कपलची लव्हस्टोरी ही तितकीच इंटरेस्टिंग आहे. अमिताभ व जया यांची पहिली भेट ‘गुड्डी’च्या सेटवर झाली होती. ऋषीकेश मुखर्जी यांनी अमिताभ आणि जया यांची भेट घालून दिली होती. अमिताभ पहिल्याच नजरेत जया यांच्या प्रेमात पडले होते. पण जया यांना अमिताभ जराही आवडले नव्हते. अर्थात नंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली.

यानंतर ‘बावर्ची’च्या सेटवर अमिताभ व जया यांचे प्रेम बहरले. या चित्रपटात जया व राजेश खन्ना लीड रोलमध्ये होते. पण अमिताभ यांना जया यांचा दुरावा सहन होईना. ते रोज ‘बावर्ची’च्या सेटवर जया यांना भेटायला जात.

1973 मध्ये अमिताभ व जया यांनी ‘जंजीर’मध्ये एकत्र काम केले. याच चित्रपटादरम्यान दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. ‘जंजीर’ हिट झाला तर सर्वजण मिळून लंडनमध्ये फिरायला जाऊ, असे ‘जंजीर’च्या टीमने ठरवले होते. यात अमिताभ व जया हे दोघेही होते.

जंजीर’ हिट झाला आणि अमिताभ यांनी लंडनला जाण्याची तयारी सुरु केली. तत्पूर्वी  वडील हरिवंशराय यांची परवानगी घेण्यासाठी ते गेले. लंडनचे नाव ऐकताच कोण कोण जाणार, असा प्रश्न हरिवंशराय यांनी अमिताभ यांना केला आणि जया यांचे नाव ऐकताच त्यांनी नकार दिला. जयासोबत जायचे असेल तर आधी तिच्यासोबत लग्न कर. लग्न न करता मी तुला जयासोबत जाऊ देणार नाही, असे हरिवंशराय म्हणाले. अमिताभ वडिलांचे शब्द टाळू शकत नव्हते. अखेर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मग काय घाईघाईत अगदी 24 तासांत जया व अमिताभ यांचे लग्न झाले. या लग्नाला केवळ पाच व-हाडी हजर होते. यानंतर दुस-याच दिवशी जया व अमिताभ लंडनसाठी रवाना झालेत.

Web Title: Interesting facts about amitabh Bachchan and jaya bachchan's wedding gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.