बॉलिवूडचे कलाकार त्यांच्या चित्रपटांव्यतिरिक्त त्यांच्या स्टाईल स्टेंटमेंटमुळे चर्चेत असतात. तसेच त्यांचे वेगवेगळ्या स्टाईल व आऊटफिटमधील फोटो सोशल मीडियावर पहायला मिळतात. याशिवाय त्यांनी परिधान केलेले आऊटफिट व अॅक्सेसरिजच्या किंमती बऱ्याचदा ऐकायला मिळतात. या किंमती लाखोंच्या घरात असतात. पण काही सेलिब्रेटी असेदेखील आहेत ज्यांना साधेपणाने रहायला आवडतं. ते आपले कपडे किंवा अॅक्सेसरीज सामान्य लोकांप्रमाणे रस्त्यांवरून विकत घेतात.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, बॉलिवूडचे हे सेलिब्रेटी बऱ्याचदा लोकल मार्केटमधून कपडे विकत घेतात. जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर एकत्र दिल्लीत स्पॉट झाले होते. त्यावेळी ते दोघे धडक चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिल्लीत आले होते. त्यावेळी ते दोघे दिल्लीतील जनपथ मार्केटमध्ये शॉपिंग करताना दिसले होते.

कतरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूर दिल्लीतील जनपथ मार्केटमध्ये शॉपिंगसाठी गेले होते. ते दोघे फितूर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिल्लीत आले होते.त्यावेळी त्या दोघांना पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती.


 

मलायका अरोरा नेहमी पॅपराजीच्या कॅमेऱ्यात कैद होते. मलायका बऱ्याचदा रस्त्यावरील ठेल्यावरून फळ आणि फूल विकत घेताना दिसते. याशिवाय तिला ग्रॉसरी शॉपबाहेरदेखील स्पॉट केले आहे. तिचे फोटो पाहून अंदाज लावू शकता की तिला फक्त मोठ्याच नाही तर छोट्या दुकानातून सामान विकत घ्यायला आवडते.

 

केदारनाथ ह्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेली सैफ अली खानची मुलगी सारा अली खान आणि तिची आई अमृता सिंगला हैद्राबादमध्ये लोकल मार्केटमध्ये शॉपिंग करताना पहिले होते. एका मुलाखतीत साराने ती लोकल मार्केट मधून कपडे खरेदी करते असे सांगितले होते.

आयुषमान खुराना दिल्लीतील प्रसिद्ध दिल्ली हाटला गेला होता. तिथे तो एका चप्पलाच्या दुकानात गेला होता. त्याचा हा फोटो बरेली की बर्फीच्या प्रमोशनवेळचा आहे.

 

अजय देवगणची पत्नी काजोल देवगण सुद्धा बऱ्याचदा लोकल मार्केटमध्ये शॉपिंग करताना दिसते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Instead of expensive showrooms, these Bollywood artists are seen doing street shopping, find out about these artists.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.