Indian-Polish giants in 'No Means No' Movie | ‘नो मीन्स नो’ चित्रपटात भारत-पोलंडच्या दिग्गजांची वर्णी!

‘नो मीन्स नो’ चित्रपटात भारत-पोलंडच्या दिग्गजांची वर्णी!

बॉलिवूडमध्ये सध्या नवनवे बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होत आहेत. मात्र, सध्या एका चित्रपटाची प्रचंड चर्चा बॉलिवूड वर्तुळात सुरू आहे, अर्थात तुम्हाला उत्सुकता असेलच. या चित्रपटाचे नाव ‘नो मीन्स नो’ असून यात भारतीय आणि पोलंडचे कलाकार असणार आहेत. हा चित्रपट बिग बजेट असून यात दिग्गज कलाकारांची वर्णी लागली आहे.

या चित्रपटाचे शूटिंग पोलंडच्या अत्यंत नयनरम्य ठिकाणी करण्यात आले असून -३०डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी तापमानात या सीन्सचे शूटिंग झाले आहेत. या चित्रपटात गुलशन ग्रोव्हर, दीप राज राणा, शरद कपूर, बॉलीवुड अ‍ॅक्शन हीरो ध्रुव वर्मा, नतालिया बॅक (पॉलिश), एना गुजिक (पॉलिश), सिल्व्हिया चेक (पॉलिश), पावेल चेक (पॉलिश), जर्सी हैंडजिक (पॉलिश), नाजिया हसन, अ‍ॅना अडोर (पॉलिश) आणि कॅट क्रिस्टियन या चित्रपटात असतील. ‘G ७ फिल्म्स पोलंड’ निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन विकाश वर्मा यांनी केले आहे.

या चित्रपटाचे आणखी एक विशेष म्हणजे दिग्दर्शक विकाश वर्मा यांचा मुलगा ध्रुव वर्मा यांना सर्वांचा लाडका संजय दत्त आणि हॉलिवूड स्टार स्टीव्हन सेगल यांनी अ‍ॅक्शन सीन्ससाठी ट्रेनिंग दिली आहे. तसेच प्रिती झिंटा यांनी ध्रुवचे ग्रुमिंग सेशन्स आणि परफेक्ट जेम्स बाँड लूकवर मेहनत घेतली आहे. शामक दावर यांनी ध्रुवला कोरिओग्राफीचे धडे दिले आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Indian-Polish giants in 'No Means No' Movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.