Indian Idol 12: Jaya Prada Regrets Not Talking to Sridevi Despite Being Locked Inside Makeup Room | Indian Idol 12 : जया प्रदा यांना श्रीदेवीशी धरलेल्या अबोल्याची वाटते खंत, सांगितला सेटवरील किस्सा

Indian Idol 12 : जया प्रदा यांना श्रीदेवीशी धरलेल्या अबोल्याची वाटते खंत, सांगितला सेटवरील किस्सा

सोनी एण्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कार्यक्रम इंडियन आयडॉलचा १२वा सीझनमध्ये नुकतीच अभिनेत्री जया प्रदा यांनी हजेरी लावली होती. जया प्रदा सेट्सवर येणार म्हणून सगळे स्पर्धक खूप आनंदले आहेत. तसेच कार्यक्रमाचा होस्ट जय भानुशाली, परीक्षक विशाल दादलानी, नेहा कक्कड आणि हिमेश रेशमिया या खास पाहुणीचे आपल्या शो मध्ये स्वागत करताना खूप उत्साहात आहेत.
 
जया प्रदा इंडियन आयडॉल सीझन १२च्या मंचाची शोभा वाढवणार आहे आणि या भागात आपल्या जीवन प्रवासातील काही किस्से प्रेक्षकांना सांगणार आहे. आपल्यात आणि श्रीदेवीमध्ये कधीच भावनिक नाते नव्हते आणि सेटवर आम्ही कधी एकमेकींशी बोललो नाही हे तिने सांगितले. ती म्हणाली की, श्रीदेवी ही बॉलिवूडमधली तिची सर्वात मोठी प्रतिस्पर्धी होती. इंडियन आयडॉलच्या सेट्सवर सर्व अभिनेत्यांबरोबर आपले नाते कसे होते हे जया प्रदाकडून ऐकायला मिळेल.
 


श्रीदेवी आणि तिच्याबरोबरचे आपले नाते, याविषयी बोलताना जया प्रदा म्हणाल्या, “मी खूप नशीबवान आहे असे मी मानते. आमच्या दोघींमध्ये वैयक्तिक वितुष्ट कधीच नव्हते पण आमच्या तारा कधीच जुळल्या नाहीत. आम्ही कधीही एकमेकींशी नजर मिळवली नाही, कारण आमच्या दोघींमध्ये स्पर्धा होती, मग ती पोशाखाची असो किंवा डान्सची! प्रत्येक वेळी जेव्हा आम्ही भेटायचो, तेव्हा आमचा एकमेकींशी परिचय करून देण्यात यायचा. आम्ही फक्त एकमेकींना ‘नमस्ते’ म्हणून निघून जायचो. 


त्यांनी पुढे सांगितले की, मला अजून आठवते आहे की, मकसद चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळेस जितूजी आणि राजेश खन्ना जी यांनी आम्हां दोघींना एका मेकअप रूममध्ये एक तास कोंडून ठेवले होते, पण आम्ही दोघी एकमेकींशी एक शब्दही बोललो नाही आणि त्यानंतर सगळ्यांनी आमच्यासमोर हात टेकले. आज ती आपल्यात नाहीये, तर मला तिची खूप आठवण येत आहे. मला एकाकी वाटते आहे, कारण या बॉलीवूड उद्योगातली ती माझी मोठी प्रतिस्पर्धी होती. ती जर मला कुठूनही ऐकू शकत असेल, तर या मंचावरून मी हेच म्हणेन की, ‘आम्ही एकमेकींशी बोलू शकलो असतो तर बरे झाले असते.”
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Indian Idol 12: Jaya Prada Regrets Not Talking to Sridevi Despite Being Locked Inside Makeup Room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.