indian air force lashes out at actor anil kapoor for wrongly wear the iaf uniform and using inappropriate language | वर्दी घालून अनिल कपूरने ओलांडली ‘सीमा’; भारतीय हवाई दल म्हणाले, सीन डिलीट करा

वर्दी घालून अनिल कपूरने ओलांडली ‘सीमा’; भारतीय हवाई दल म्हणाले, सीन डिलीट करा

ठळक मुद्देअनिल व अनुरागचा ‘AK vs AK’ हा सिनेमा लवकरच नेटफ्लिक्सवर रिलीज होतोय.

अनिल कपूर आणि अनुराग कश्यपचा ‘'AK vs AK’ हा आगामी सिनेमा सध्या जाम चर्चेत आहे. या सिनेमासाठीचा प्रमोशनल स्टंट तुम्ही पाहिलाच. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनिल व अनुराग दोघेही ट्वीटरवर दोघेही खरे वाटावे इतके भांडले. पण नंतर ट्वीटरवरचे हे भांडण नुसता प्रमोशनचा फंडा असल्याचे स्पष्ट झाले. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला.  चित्रपटाचे काही प्रमोशनल व्हिडीओही रिलीज झाले. यातलाच एक व्हिडीओ  पाहून भारतीय हवाई दलाने लगेच आपला आक्षेप नोंदवला.

होय, चित्रपटाच्या व्हिडीओमध्ये अनिल कपूर हवाई दलाची वर्दी घालून आणि आक्षेपार्ह शब्दांचा वापर करताना दिसतोय. भारतीय हवाई दलाने यावर तीव्र आक्षेप नोंदवत, हा सीन सिनेमातून डिलीट करण्याची मागणी केली आहे.

हवाईदलाने ‘AK vs AK’ चा व्हिडीओ रिट्वीट करत, एक ट्वीट केले आहे. ‘या व्हिडीओत हवाई दलाच्या वर्दीचा चुकीचा वापर केला गेला आहे. भाषाही आक्षेपार्ह आहे. भारतीय सशस्त्र दलांच्या सैनिकांच्या व्यवहाराशी हा व्हिडीओ कुठेही सुसंगत नाही. हा सीन चित्रपटातून वगळला जावा,’ असे ट्वीट हवाई दलाने केले आहे.
यापूर्वीही बॉलिवूडचे काही सिनेमे व वेब शो याच कारणांमुळे वादात सापडले आहेत. अलीकडे एकता कपूरच्या एका वेबसीरिजमध्ये लष्कराच्या पोशाखातील एका पात्रावर आक्षेपार्ह दृश्ये चित्रीत करण्यात आली होती. यावरून मोठा वाद निर्माण झाला होता.

अनिल व अनुरागचा ‘AK vs AK’ हा सिनेमा लवकरच नेटफ्लिक्सवर रिलीज होतोय. या सिनेमात अनुराग कश्यप अनिल कपूरच्या मुलीला किडनॅप करेल आणि यामुळे दोघेही एकमेकांशी भिडतील. याच सिनेमाची झलक दोघांनी गेल्या रविवारी ट्वीटरवर दाखवली  होती. याच सिनेमाच्या प्रमोशनसाठी अनिल व अनुराग ट्वीटरवर एकमेकांशी भिडले. ‘सेक्रेड गेम्स’ फेम विक्रमादित्य मोटवानी हा सिनेमा दिग्दर्शित करतोय. सिनेमात  अनुराग अनिल कपूरच्या मुलीचे अपहरण करतो. आपल्या मुलीला शोधण्यासाठी अनिलकडे फक्त 10 तास असतात. याच 10 तासांचा ड्रामा सिनेमात पाहायला मिळणार आहे. येत्या 24 तारखेला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होतोय. 

OMG!  रागाच्या भरात अनुराग कश्यपने चक्क अनिल कपूरच्या तोंडावर फेकलं पाणी!!

AK vs AK ! अनिल कपूर व अनुराग कश्यप ट्विटरवर का भांडले? कारण ऐकून व्हाल थक्क

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: indian air force lashes out at actor anil kapoor for wrongly wear the iaf uniform and using inappropriate language

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.