प्रत्येक अभिनेत्याला एक अशा चित्रपट निर्मात्याची आवश्यकता असते जो आपले खरे कौशल्य दाखवून त्याला एक नवीन उंची देऊ शकेल. तथापि, हिट अभिनेता-दिग्दर्शकाच्या जोड्यांची बरीच उदाहरणे आहेत आणि आता असे दिसते की पुन्हा अशीच एक जोडी निर्माण होतेय ती म्हणजे इम्तियाज अली आणि कार्तिक आर्यन यांची. लव्ह आज कल  ह्या चित्रपटाच्या निमित्ताने दोघे पहिल्यांदा एकत्र आले आहेत. 


कार्तिक आर्यन म्हणाला की, 'लव आज कल'वर काम  करताना अभिनेता म्हणून मी आणखी परिपक्व झालो आहे. इम्तियाज अलीयांच्या कडून बऱ्याच गोष्ट शिकायला मिळाल्या ज्याचा मला भविष्यात फायदा होईल. 

इम्तियाज अली कार्तिक आर्यनबद्दल बोलताना म्हणाला, कार्तिक आर्यनला असाधारण अभिनेता आहे. इम्तियाजला  कार्तिकमध्ये शाहरुख खानचे बरेच गुण दिसले. तो म्हणतो, की दोघेही त्यांच्या कामासाठी पूर्णपणे समर्पित आहेत.


येत्या १४ फेब्रुवारी रोजी 'लव्ह आज कल' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.प्रेमात असणाऱ्या कार्तिकची सारा आणि आरुषीसोबत मजेशीर केमिस्ट्री ट्रेलरमध्ये पहायला मिळाली. लव आज कलमध्ये दोन काळ दाखवण्यात आले आहेत. त्यातील नव्वदच्या काळातील दिसण्यासाठी म्हणजेच एकदम तरूण दिसण्यासाठी कार्तिकला वजन घटविण्याची गरज होती आणि तो लगेच तयारही झाला. या चित्रपटात तो रघु व वीर अशा दोन भूमिका साकारताना दिसणार आहे. रघु ९०च्या काळातील आहे. तर वीर आताच्या जमान्यातील आहे. अशात दोन्ही भिन्न पात्र असल्यामुळे दिग्दर्शक इम्तियाज अलीने कार्तिकला वजन घटवायला सांगितले. रघु हे पात्र स्कूल गोइंग बॉय आहे. त्यामुळे या लूकसाठी कार्तिकने कोणतीही कसर सोडली नाही. त्याने वजन घटविले सोबतच हेअर स्टाईलही बदलली.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Imtiaz ali impress by kartik aaryan acting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.