मैं तेरा हीरो, रुस्तम, मुबारकां, बादशाहो व रेड यांसारख्या चित्रपटात आपल्या अभिनयानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी अभिनेत्री इलियाना डिक्रुझने सेक्स लाईफबद्दल खुलासा केला आहे. इलियाना चित्रपटांशिवाय बऱ्याचदा विधानांमुळे चर्चेत येत असते. यावेळी तिने सेक्स लाईफबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे ती चर्चेत आली आहे.

इलियाना डिक्रुझ नुकतीच गायिका शिबानी दांडेकरचा शो 'The Love Laugh Live Show'मध्ये हजेरी लावली. यावेळी तिने चित्रपटांशिवाय खासगी आयुष्याबद्दल बरेच खुलासे केले आहेत.

या शोमध्ये शिबानीने इलियानाला तिचे एक स्टेटमेंट लक्षात आणून दिले ज्यात ती म्हणाली होती की, सेक्स आणि प्रेमाचा काहीच संबंध नसतो.  या विधानाची आठवण करून देत शिबानीने इलियानाला तिच्या सेक्स लाइफबद्दल चर्चा केली.


त्यावेळी इलियानाने शिबानीच्या या गोष्टींचे स्पष्टपणे उत्तर दिलं. ती म्हणाली की, कदाचित माझ्या विधानाकडे चुकीच्या पद्धतीने पाहिलं गेलं. असं असू शकत की मी कोणाच्यातरी आणि विधानावर मत व्यक्त केलं असेल जे मला आवडलं असेल. त्यावर मी बोलले असेन की, मी सेक्स एन्जॉय करते आणि त्याच्याकडे वर्कआऊट म्हणून पाहते. मला हे योग्य वाटत नाही.


आपल्या या गोष्टींना विस्तारीतरित्या सांगताना इलियाना डिक्रुझ म्हणाली की, माझ्या म्हणण्याचा हा अर्थ आहे की, माझ्या मते सेक्स एन्जॉय केलं पाहिजे मात्र त्यामागे भावनादेखील असल्या पाहिजेत. जेव्हा तुमच्यात प्रेम असते तेव्हा सेक्स करणं चांगलं वाटतं. यात दोन आत्मा सहभागी होत असतात. 


याशिवाय इलियानाने आपल्या ब्रेकअपबद्दल सांगितलं. इलियाना व तिच्या बॉयफ्रेंडमध्ये खूप भांडणं झाली. त्यानंतर त्यांनी वाद सोडवला नाही आणि ब्रेकअप केले. 
वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर इलियाना आगामी सिनेमा पागलपंतीमध्ये झळकणार आहे. या कॉमेडी ड्रामा चित्रपट असून तिच्यासोबत या सिनेमात जॉन अब्राहम, अनिल कपूर, सौरभ शुक्ला, कृति खरबंदा, अरशद वारसी, उर्वशी रौतेला व पुलकीत सम्राट मुख्य भूमिकेत आहेत.

हा चित्रपट २२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ileana DCruz Said Physical Relation Should Enjoy In Shibani Dandekar Show The Love Laugh Live

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.